Andrew Symonds Passed Away | अक्षय कुमारसोबत या चित्रपटात दिसला होता अँड्र्यू सायमंड्स, बॉलीवुडशी होते खास कनेक्शन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – Andrew Symonds Passed Away | ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्रयू सायमंड्सच्या निधनाचे वृत्त समोर येताच जगभरात शोककळा पसरली आहे. या 46 वर्षीय खेळाडूचा शनिवारी रात्री कार अपघात झाला (Andrew Symonds Passed Away), त्यानंतर त्याचा मृत्यू झाला (Andrew Symonds Dies In Car Crash) . क्रिकेटविश्वात एक वेगळी ओळख असलेला सायमंड्स एक उत्तम गोलंदाज आणि फलंदाज तर होताच, शिवाय तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही होता. पण फार कमी लोकांना माहित असेल की, वादांशी घनिष्ठ संबंध असलेल्या या क्रिकेटरचे बॉलिवूडशीही विशेष कनेक्शन होते. (Andrew Symonds Connection With Bollywood)

 

क्रिकेटच्या खेळपट्टीवर आपले कौशल्य दाखविणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अँड्रयू सायमंड्सने बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. त्याने पतियाळा हाऊस (Patiala House) या बॉलिवूड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2011 च्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) मुख्य भूमिकेत दिसले होते. (Andrew Symonds Passed Away)

 

या चित्रपटात अँड्र्यू सायमंड्सने स्वतःचीच भूमिका साकारली होती. त्याच वेळी अक्षय कुमारकडे मॉन्टी पानेसरपासून (Monty Panesar) प्रेरित वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारली होती.
सायमंड्सचा हा पहिलाच चित्रपट होता, त्यानंतर त्याची हिंदी चित्रपटांमध्ये आवड वाढली.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सायमंड्स चित्रपटातील त्याचे सहकलाकार ऋषी कपूर,
अनुष्का शर्मा आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबत खूप धमाल करत होता.

अँड्रयू सायमंड्सने केवळ बॉलीवूडच नाही तर सलमान खानचा (Salman Khan) प्रसिद्ध आणि
वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ’बिग बॉस’च्या 5 व्या (Bigg Boss 5) सीझनमध्येही भाग घेतला होता.
तो दोन आठवडे या शोमध्ये पाहुणा म्हणून राहिला होता. यादरम्यान,
त्याला बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Home) इंग्रजी बोलण्याची परवानगी देखील देण्यात आली होती, ते शोच्या नियमांच्या विरोधात होते.

 

बिग बॉस 5 मध्ये दिसलेला अँड्रयू सायमंड्सचे यावेळी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीसोबत चांगले जुळले होते.
बिग बॉसनंतर अँड्र्यू सायमंड्स ’सेलिब्रिटी क्रिकेट लीग’मध्येही दिसला होता.
यादरम्यान त्याने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत (Bipasha Basu) स्टेजवर एक दमदार परफॉर्मन्स दिला होता.

 

Web Title :- Andrew Symonds Passed Away | andrew symonds passed away andrew symonds was seen in patiala house with akshay kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli Crime | कौटुंबिक वादातून सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून; मेहुणा पोलिसांच्या ताब्यात

 

Itching And Rashes Problem In Summer | उन्हाळ्यात त्वचेला खाज-जळण्याची समस्या वाढते, ‘हे’ उपाय अत्यंत प्रभावी; जाणून घ्या

 

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा