आता घरातून काम करताना येणार नाही अडचण ! Google करणार अँड्रॉइड-12 मध्ये ‘हे’ खास बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे बहुतांश कंपन्या रिमोट लेव्हलवर काम करत आहेत. सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने कर्मचार्‍यांना घरून काम करण्यात सांगितले गेले आहे. अशावेळी जास्त कर्मचार्‍यांना जोडण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे काम केले जात आहे. व्हीपीएनच्या वाढत्या मागणीने नव्या पीढीच्या व्हीपीएन प्रोटोकॉल वायरगार्डला जन्म दिला आहे. आता गुगलने सुद्धा अँड्रॉइड-12च्या लिनक्स कर्नेलमध्ये वायरगार्ड सपोर्ट जोडण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, सर्व अँड्रॉइड12 स्मार्टफोन व्हीपीएन सिस्टमसोबत येतील. आयओएस स्मार्टफोनमध्ये हे फिचर अगोदरपासूनच आहे.

इतरांच्या तुलनेत जास्त वेगवान वायरगार्ड प्रोटोकॉल
वायरगार्ड यूजर्सना दूरच्या नेटवर्कने कनेक्ट करण्याच्या दरम्यान त्याची गोपनीयता, सुरक्षा आणि जलदगतीने काम करण्यासाठी अत्याधुनिक क्रिप्टोग्राफी मानकांचा वापर करते. प्रोटोकॉलमध्ये कोडच्या चार हजार कोडच्या खुप कमी लाइन असतानाही वायरगार्ड एक नवी व्हीपीएन प्रोटोकॉल आहे आणि अन्य प्रोटोकॉलच्या तुलनेत वेगवान मानला जात आहे.

याच्या तुलनेत ऑपन व्हीपीएन नावाचे एक अन्य व्हीपीएन प्रोटोकॉल कोडच्या 100,000 लाइनवर चालते. रिलीजच्या नंतर ताबडतोब वायरगार्डला लिनक्स कर्नेलमध्ये जोडले गेले आणि लिनक्स 5.6 मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. कारण अँड्रॉइड सुद्धा लिनक्सवर आधारित आहे. आता गुगलने नुकतेच अँड्रॉइड कॉमन कर्नेलच्या अँड्रॉइड12 च्या लिनक्स 5.4 आणि 4.19 मध्ये अन्य नवीन परिर्वन जोडले आहेत. या नवीन जोडण्यांमध्ये वायरगार्ड वीपीएन प्रोटोकॉलचा सुद्धा समावेश आहे.

अशाप्रकारे करेल काम
एका रिपोर्टनुसार, एका लिनक्स कर्नेल डेव्हलपरचे म्हणणे आहे की, वायरगार्ड अँड्रॉइड 12 मध्ये एक साधारण नेटवर्क डिव्हाईस ड्रायव्हरच्या रूपात उपलब्ध असेल. प्रत्येक नव्या अँड्रॉइड रिलीजसोबत गुगल लिनक्स कर्नेलल सपोर्ट करेल.

You might also like