तुमच्या ‘स्मार्टफोन’मधून तात्काळ ‘डिलीट’ करा ‘हे’ App, अन्यथा पैसे होतील ‘कट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अँड्रॉइड मोबाईलमध्ये युजर्स अनेक अ‍ॅप वापरत असतात. मात्र त्यातील काही अ‍ॅप नुकसानकारकही असतात. त्यापैकी एक अ‍ॅप असे आहे जे बॅकग्राउंडमध्ये प्रीमियम कॉन्टेंट साइन इन करतात आणि त्यामुळे युजर्सचे पैसे कट होतात. या गोष्टींचा युजर्सलाही तपास लागत नाही. अहवालानुसार अँड्रॉइड वापरकर्त्यांद्वारे हे अ‍ॅपअनेकवेळा डाउनलोड केले गेले आहे. हे प्रत्यक्षात एक कीबोर्ड अ‍ॅप आहे.

कीबोर्ड अ‍ॅप्स बरेच लोकप्रिय आहेत आणि वापरकर्ते त्यांचा कीबोर्ड कस्टमाइज करण्यासाठी त्यांचा वापर करतात. Ai.type कीबोर्ड त्यापैकी एक आहे. हा अ‍ॅप कीबोर्ड Ai.type करणारा आहे. याद्वारे कीबोर्डमध्ये बरेच नवीन फीचर्सही जोडली जाऊ शकतात.

सायबर सिक्युरिटी फर्म SecureD च्या वृत्तानुसार, हे अ‍ॅप इस्राईलमध्ये विकसित केले गेले आहे आणि ai.type LTD द्वारा तयार केले गेले आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की Google ने ते जूनमध्ये प्ले स्टोअर वरून हटवले होते, मात्र अद्याप ते सक्रिय आहे.

हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर नाही, तरीही तो आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तो प्रीमियम कॉन्टेंटसाठी साइन इन करू शकतो. हे Google Play स्टोअर वरून 40 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले.

हे अ‍ॅप प्रीमियम सर्विसलाही सब्सक्राइब करू शकतो आणि यासाठी आपलाच मोबाइल डेटा वापरला जातो. एवढेच नाही तर अहवालानुसार हे अ‍ॅप बॅटरीचे आयुष्य देखील कमी करते, म्हणजे ते अ‍ॅप युज करत नसतानाही बॅटरी वापरली जाते.

या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये अनावश्यक अ‍ॅप्स ठेवू नका. ज्यावर आपला विश्वास नाही असे अ‍ॅप आपण डाउनलोड करत असताना तर नंतर त्या डेव्हलपरविषयी माहिती घ्या तसेच इंटरनेट वापरुन त्याबद्दल माहिती संकलित करा.

Visit : Policenama.com