Android Update Alert | आपला अँड्रॉईड फोन तात्काळ करा अपडेट, सरकारी सिक्युरिटी एजन्सीने दिला इशारा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Android Update Alert | जर तुमच्याकडे सुद्धा एखादा अँड्रॉईड फोन (Android Phone) किंवा अँड्रॉईड टॅबलेट (Android Tablets) आहे तर तुमच्यासाठी मोठा इशारा आहे. भारतीय कम्प्युटर आपत्कालीन कृती टीमने (Cert) अँड्रॉईड यूजर्ससाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. Cert-In ने म्हटले की अँड्रॉईडमध्ये एक मोठा एक बग मिळाला आहे. ज्यामुळे अँड्रॉईड 9, अँड्रॉईड 10, अँड्रॉईड 11 आणि अँड्रॉईड 12 चे यूजर्स सर्वात जास्त निशाण्यावर आहेत. (Android Update Alert)

 

Cert-In ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टममधील एक बग ऑर्बिटरी कोड लीक करू शकतो. याशिवाय फोनमधील महत्वाची माहिती सुद्धा हॅकरपर्यंत पोहचवू शकतो.

 

हा बग मीडिया कोडॅक, मीडिया फ्रेमवर्कमध्ये आहे जो गुगल प्ले-सिस्टमच्या संपर्कात आहे. हा बग चिप निर्माता कंपनी क्वॉलकॉमच्या करनाल कॉम्पोनंट, सोर्स कॉम्पोनंट आणि मीडियाटेकच्या चिपमध्ये सुद्धा आहे. भारताच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम आणि मीडियाटेकचे चिप आहे. (Android Update Alert)

Google ला या बग बाबत माहिती मिळाली, ज्यानंतर त्यांनी मागील आठवड्यात सिक्युरिटी अपडेट जारी केले. नवीन सिक्युरिटी अपडेट 2021-12-05 च्या नावाने आले आहे. या बगने प्रभावित कोणत्याही डिव्हाईसचा पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही. सध्या ही केवळ एक शंका आहे.

 

CERT-In ने अँड्रॉईडशिवाय गुगल क्रोमच्या यूजर्ससाठी सुद्धा इशारा जारी केला आहे.
क्रोमबाबत Cert-In ने म्हटले आहे की, ब्राऊजरमध्ये एका बगमुळे हॅकर फोन रिमोटली घेऊ शकतात
आणि यूजर्सच्या परवानगीशिवाय त्याचा फोन ऑपरेट करू शकतात.

 

Web Title :- Android Update Alert | cert in issued warring for android user lets you update your android device immediate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune School Reopan | पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवारपासून सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती (व्हिडिओ)

Maharashtra Vidhan Parishad Election 2021 | ‘वा..वा मिटकरी लैच बोलायला लागले’; चंद्रकांत पाटलांचा अमोल मिटकरींना टोला

डायबिटीजच्या रुग्णांनी दूधात ‘या’ 2 गोष्टी मिसळून प्याव्यात, Blood Sugar Level नियंत्रित करण्यासाठी पडतील उपयोगी

Shama Sikander | लाल रंगाची बिकिनी घालून शमा सिकंदर उतरली स्विमिंग पूलमध्ये, हॉट फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं ‘तापमान’

Supreme Court | महाराष्ट्र भाजपला झटका ! 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी 11 जानेवारीला