सावधान ! ‘हे’ अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ ‘डिलीट’ करा, अन्यथा ‘रिकामं’ होईल बँक खातं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोनमुळे यूजर्सचे कामं आणि जीवन सुसज्ज झाले असले तरी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणं तितकेच धोकादायक झाले आहे. त्यामुळे अॅण्ड्राइड यूजरसाठी अशीच एक महत्वाची धोक्याची घंटा आहे. असे एक अॅप समोर आले आहे ज्याआधारे तुमच्या बँक खात्यासंबंधित माहिती तुमच्या नकळत चोरली जाते आणि तुमचे खातं काही क्षणात रिकामे होते. सेक्युअर डी टीमकडून करण्यात आलेल्या संशोधनात ai.type अशा नावाचे अॅप सापडले आहे, जे यूजर्सच्या परवानगीशिवाय प्रीमियम डिजिटल सर्विस खरेदी करते, यामध्ये युजर्सला प्रीमियम कंटेंट सर्विस खरेदी केल्याचे लक्षात येत नाही.
सेक्युअर डी टीमने सांगितले की, हे अॅप बॅकग्राउंडला काम करते त्यामुळे यूजर्सला कल्पना न देता खोट्या जाहिराती दाखवल्या जातात. त्याचवेळी अॅप जेव्हा ग्राहक डिजिटल खरेदी करतात तेव्हा यूजर्सच्या खाते रिकामे करण्याचा प्रयत्न केला जातो.
Ai.type हे एक थर्ड-पार्टी keyboard अँड्रॉइड अॅप आहे. या अॅपचे 4 कोटी पेक्षा जास्त यूजर्स आहेत. इस्त्रायली कंपनी ai.type LTD यांनी हे तयार केले आहे. ज्याच्या डिस्क्रिपशनमध्ये Free Emoji keyboard असे आहे.
सेक्युअर डी टीमच्या मते, फसवणूक करुन या अॅपने आतापर्यंत 127 कोटी रुपयांचा चुना यूजर्सला लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू सेक्यूअर डीने हा प्रयत्न हाणून पाडला आहे. 1 लाखापेक्षा जास्त मोबाइलमधून जवळपास 1 कोटी 40 लाख रुपयांचे ट्रान्जेक्शनच्या रिक्वेस्ट आल्या आहेत. हे अॅप जवळपास 13 देशात वापरात आहे.
प्ले स्टोअरमधून हे अॅप हटवण्यात आले होते, मात्र हे अॅप यूजर्सने अजूनही अन इन्स्टॉल केलेले नाही ज्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे यूजर्सला सूचना दिल्या आहेत की हे अॅप अन इन्स्टॉल करावे.
Visit : Policenama.com
- तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके