Anees Bazmee | अनीस बज्मी यांनी धुडकावली ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर; दिले ‘हे’ कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Anees Bazmee | अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा 2000 मध्ये आलेला चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ आणि 2006 मध्ये आलेला ‘ हेरा फेरी – 2’ या चित्रपटाने लोकांना हसून हसून अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. नुकताच अक्षय कुमारने ‘हेरा फेरी – 3’ मध्ये तो दिसणार नाही या गोष्टीचा खुलासा केला होता, तर अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यनला या चित्रपटात कास्ट केल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. (Anees Bazmee)

 

सध्या हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर निर्माते ‘हेरा फेरी – 3’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा शोध घेत होते. यादरम्यान त्यांनी अनीस बज्मी यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा केली असता, त्यांनी मात्र या ऑफरला नकार दिला आहे. (Anees Bazmee)

 

अनीस बज्मी यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टींचा खुलासा केला आहे. यावर ते म्हणाले “हो मला हेरा फेरी 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा आली होती आणि मी या ऑफरला नकारही दिला हेही खरे आहे. कारण सध्या माझ्या इतर चित्रपटांच्या चित्रीकरणांमध्ये मी व्यस्त आहे. यामुळे मी हेरा फेरी 3 या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी वेळ देऊ शकत नाही. माझं सगळं शेड्युल व्यवस्थित लागले आहे. हेरा फेरी 3 साठी माझ्या तारखा सध्या मी देऊ शकत नाही. यामुळे मी स्पष्टपणे या चित्रपटाला नकार दिला आहे.

https://www.instagram.com/accounts/login/?next=%2Fp%2FCYViRf-Ikd9%2F&source=omni_redirect

‘भुलभुलय्या 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अनीस बज्मी यांनी केले होते.
या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर 185 कोटी रुपयांची कमाई केली होती.
त्याचबरोबर अनीस बज्मी यांनी ‘नो एंट्री’ आणि ‘वेलकम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते.
अद्याप जरी त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला नकार दिला असला तरी येणाऱ्या काळात हेरा फेरी 3 या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ते सांभाळणार का हे काही दिवसात स्पष्ट होईल.

 

Advt.

Web Title :- Anees Bazmee | anees bazmee rejected hera pheri 3 offer because of his busy schedule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश