‘भाईजान’ च्या ‘या’ अभिनेत्रीचे परिस्थितीमुळे झाले ‘हाल’, सलमाननंतर ‘दिग्दर्शक’ मदतीसाठी आला पुढं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘वीरगति’ (१९९५) मधील अभिनेत्री पूजा डडवालला आपण जाणताच. आज ही अभिनेत्री आजारपणाला मात करून सामान्य जीवनात परतली आहे. पूजाला क्षयरोग आणि फुफ्फुसाचा आजार होता पण तिची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तिच्यावर उपचार करणे सोपे नव्हते. सलमानला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने मदत केली आणि उपचाराचा खर्चही केला. सलमाननंतर बॉलिवूडमधील आणखी एका नामांकित व्यक्तीला तिला मदत करायची आहे.

आजारातून बरे झाल्यानंतर पूजाला आता चित्रपटांमध्ये परत यायचे आहे. असे दिसत आहे की, पुजाची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. लेखक आणि दिग्दर्शक अनीस बाझमी यांनी पूजाला चित्रपटात संधी देणार असल्याचे सांगितले आहे. बाझमी म्हणाले की, ‘मी माझ्या पुढच्या चित्रपटात पूजाला घेईन. शेवटी भावना नेहमीच आमच्यासाठी कारकीर्दीपेक्षा महत्वाची असतात.

बाझमी म्हणाले की, ‘उद्योगात असे बरेच लोक आहेत जे तिला मदत करतील. मी पूजाला नक्कीच एखादी भूमिका देईन. लेखक म्हणून मी पटकथामध्ये भूमिका घेण्याचा प्रयत्न करेन. याचा अर्थ असा नाही की मी हे केवळ आनंदसाठी करत आहे. मला वाटते की ती कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.’

नुकत्याच एका मुलाखतीत पूजा म्हणाली की, ‘दोन दशकांपूर्वी मी फिल्म इंडस्ट्री सोडली होती पण आता मला परत यायचे आहे. टीव्ही, चित्रपट किंवा डिजिटल मीडियाशी संबंधित कोणतीही कामे, जी माझ्यासाठी फिट असतील, ते मी करेन. एका मुलाखतीत पूजा आपल्या आजाराचे दिवस आठवत म्हणाली की, ‘सुरुवातीला मला टीबी आहे हे देखील माहित नव्हते. कुटुंबानेही कोणतीही मदत दिली नाही. त्यावेळी मला रक्ताच्या उलट्या व्हायच्या, माझे केस खूप गळत होते त्यानंतर मी केसांना कंघी करणे सोडून दिले.’

पूजा म्हणाली की, “जेव्हा ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचली तेव्हा सलमान खानला माझ्याबद्दल माहिती मिळाली ज्यानंतर त्याने मला मदत केली. त्याच्या टीमला मला खासगी रुग्णालयात नेण्याची इच्छा होती, परंतु मला शिवडीतील टीबी रूग्णालयात उपचार घ्यायचे होते कारण इथले उपचार चांगले असल्याचे ऐकले होते. यानंतर सलमानच्या टीमने ते सरकारी रुग्णालय खासगी केले.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like