Anemia Problem | अ‍ॅनिमियाची समस्या असेल तेव्हा काय खावे आणि काय करावे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अ‍ॅनिमियाची समस्या (Anemia Problem) असाध्य नाही, पण वेळीच गांभीर्याने न घेतल्यास त्याचा आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्या (Anemia Problem) असेल तर जाणून घ्या आहार आणि जीवनशैलीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल आवश्यक आहेत (Diet And Lifestyle Changes For Anemia Problem).

 

अन्नामध्ये लोह, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनच्या (Iron, Folic Acid, Vitamins And Proteins) कमतरतेमुळे शरीरातील लाल रक्तपेशींची (Red Blood Cells) संख्या कमी होते आणि या वैद्यकीय स्थितीला अ‍ॅनिमिया (Anemia ) म्हणतात. त्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्या असेल, मग ती स्त्री असो वा पुरुष, या काळात कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणि जीवनशैली याविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल जाणून घेणार आहोत (Anemia Problem).

 

काय करावे (What To Do) –

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांव्यतिरिक्त सफरचंद, डाळिंब, बीट, खजूर, शेंगदाणे, गूळ आणि सुका मेवा (Apple, Pomegranate, Beetroot, Dates, Peanuts, Jaggery And Nuts) यांचा प्रामुख्याने समावेश करा.

शरीरात फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवण्यासाठी कुट्टूचे पीठ, ओटमील, कोबी मशरूम, ब्रोकोली, मध आणि एस्पेरेगा (Kuttu Flour, Oatmeal, Cabbage, Mushrooms, Broccoli, Honey And Asparagus) यांचा आहारात समावेश करा.

– लोखंडी कढईत भाज्या शिजवून घ्या.
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी अन्नामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी (Protein, Calcium And Vitamin C) यांचाही प्रामुख्याने समावेश करावा.
त्यासाठी सर्व प्रकारच्या डाळी, मोड आलेली कडधान्ये, संत्री, आवळा, द्राक्षे यासारखे लिंबूवर्गीय हंगामी फळे
यांचा आवर्जून समावेश करा. यामुळे शरीराची लोह शोषून घेण्याची क्षमता वाढते.

 

मांसाहारी असाल तर लाल मांस आणि अंड्यांचे (Red Meat And Eggs) सेवन फायदेशीर ठरेल.
अनावश्यक थकवा किंवा अशक्तपणा अशी लक्षणे आढळल्यास सीबीसी (संपूर्ण रक्त गणना) चाचणी अवश्य करून घ्या.
रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिनची पातळी १२ ग्रॅमपेक्षा कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या घ्या
आणि रक्तातील लोहाची पातळी सामान्य होईपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या पूरक आहारांचे सेवन करत राहा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Anemia Problem | anemia problem what to do if there is a problem of anemia and what to avoid know here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mint Tea Benefits | रोज प्यायलात पुदीन्याचा चहा, तर होतील ‘हे’ 3 आश्चर्यकारक फायदे

 

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

 

Headache In Summer | उन्हाळ्यात डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा