सर्जरीसाठी अभिनेता अंगद बेदी रुग्णालयात, ‘या’ गोष्टीवरून पत्नी नेहा धुपियाची उडवली ‘खिल्ली’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टायगर जिंदा है, सूरमा आणि जोया फॅक्टर अशा अनेक सिनेमात काम करणारा अभिनेता अंगद बेदी शुटींगदरम्यान जखमी झाला आहे. सध्या अंगद मुम्भाईची शुटींग करत होता. साऊथ बॉम्बेमध्ये शुटींग सुरू होती. एका अ‍ॅक्शन सीक्वेंसदरम्यान त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. याला आता एक महिना झाला आहे आणि आता अंगद आपल्या पायाची सर्जरी करणार आहे.

अंगदनं आपल्या इंस्टाग्रामवरून अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अंगद सर्जरीसाठी जाताना दिसत आहे. नेहा त्याच्या सोबत आहे. नेहानंच हा व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, नेहा अंगदला विचारत आहे की, तू सर्जरीनंतर काय खाणार आहेस ? ही मोठी वेळ असणार आहे की तू काहीही न खाता राहणार आहेस. यावर अंगद म्हणतो, मी 8 तासांपासून काहीच खाल्लं नाही.

वॅलेंटाईन डेच्या आधीच अंगदनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अंगद म्हणतो, “हा मी आहे. गुडघ्याच्या सर्जरीसाठी जाण्यापूर्वीचा. मला माहिती आहे की, खूप बडबड करणं माझ्या रक्तातच आहे. हे माझ्या पत्नीनं रेकॉर्ड केलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, तिला हेच माहिती नाही की, कोणत्या गुडघ्याची सर्जरी होणार आहे. तरीही माझं तिच्यावर खूप प्रेम आहे.”