नेहा धुपिया होती लग्नाआधीच प्रेग्नंट… ‘ही’ होती कुटुंबीयांची प्रतिक्रिया 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – बाॅलीवूडची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा गौप्यस्फोट खुद्द तिचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने केला आहे. काही महिन्यांपूर्वी कोणताही गाजावाजा न करता अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदीनं आपला विवाहसोहळा उरकला. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकेपर्यंत अनेकांना या लग्नाबद्दल खबरही नव्हती. त्यामुळे अंगद बेदी आणि नेहाचा विवाहसोहळा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. नेहा लग्नाआधीच गर्भवती असल्यानं हा विवाहसोहळा तडकाफडकी करण्याचा निर्णय घेण्यात आला हे नंतर उघड झालं. नेहाने घाई-गडबडीत लग्न उरकल्यानंतर तिचं बेबी बम्प दिसू लागल्यावर चाणाक्ष चाहत्यांनी आधीच तर्क लावला होता. अखेर, हो-नाही करता करता अंगदने याची कबूली दिली आहे.
लग्नानंतर नेहा कायम सैल कपड्यांमध्येच दिसत होती. गर्भवती असल्याचं समजू नये, यासाठी तिने काळजी घेतल्याचं म्हटलं जात होतं. अखेर लग्नाच्या तीन महिन्यानंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्यात दोघांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावरुन दिली. 35 वर्षीय अंगद आणि 37 वर्षीय नेहा 10 मे रोजी पंजाबमधील एका गुरुद्वारात विवाहबंधनात अडकले होते. नेहा प्रेग्नंट असल्यामुळे दोघांनी घाईने लग्न केल्याच्या चर्चांना काही दिवसांतच सुरुवात झाली. मात्र नेहा आणि अंगद या दोघांनीही लग्नाआधी नेहा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा उडवून लावल्या होत्या.
‘माझी गर्लफ्रेण्ड नेहा प्रेग्नंट आहे, असं मी घरी सांगितलं तेव्हा घरी खूप ओरडा पडला. अखेर मी आई-वडिलांना घेऊन नेहाच्या घरी गेलो आणि आम्ही तिच्या आई-वडिलांना प्रेग्नन्सीविषयी सांगितलं. त्याचवेळी मी नेहाला प्रपोजही केलं.’ असं अंगदने सांगितलं.
गर्भवती असल्याची गोष्ट सहाव्या महिन्यापर्यंत मी लपवून ठेवली होती. कदाचित मी गर्भवती असल्याचं समजताच मला कोणीही काम देणार नाही माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सारखी वाटायची म्हणूनच मी बातमी लपवून ठेवली होती असं तिनं कबुल केलं.
‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी विद्या बालनसोबत ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात, तर ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती. अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. अंगद बेदीनेही काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.