स्वतंत्र्यदिनाच्या दिवशीच राज्यातील अंगणवाडी सेविकांचे ‘जेलभरो’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अंगणवाडी सेविका वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधत आपले गाऱ्हाणे मांडणार होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी या सेविकांना वेळ न दिल्याने, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मानधनवाढीची अंमलबजावणी करावी, यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदांवर जेलभरो आंदोलन सुरू केले आहे.

या आहेत अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या –

आदिवासी केंद्रांना एक हजार रुपये द्यावेत.
नागरी अंगणवाडी केंद्रांना ४ हजार द्यावेत.
महानगरमधील अंगणवाडी केंद्रांना सहा हजार भाडे देण्यात यावे.
पूर्वशालेय शिक्षण संचाचे ५ हजार देण्यात यावेत.
फर्निचरसाठी १० हजार मिळावेत.
पिण्याच्या पाण्यासाठी दहा हजार द्यावेत.
मोबाइल वापरण्याबाबतच्या अडचणी दूर कराव्यात / किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करावी.

अशा मागण्या घेऊन अंगणवाडीसेविका रक्षाबंधनदिवशी मुख्यमंत्र्यांना भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे स्वतंत्र दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त