22 सप्टेंबरला येत आहे आणखी एक IPO, गुंतवणुकदारांसाठी ‘कमाई’ची संधी

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून आयटी सेक्टरची हॅप्पीएस्ट माईंड्स टेक्नॉलॉजी लिमिटेड खुप चर्चेत आहे. या कंपनीचा नुकताच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ आला आहे. ज्या लोकांनी हे आयपीओ घेतले त्यांना भरपूर नफा झाला. मात्र, असे अनेक लोक आहेत ज्यांना हे माहित नसल्याने त्यांची संधी हुकली.

आणखी एका कंपनीचा आयपीओ
आता आणखी एका कंपनीचा आयपीओ येत आहे. या कंपनीचे नाव एंजल ब्रोकिंग आहे. एंजल ब्रोकिंगचा आयपीओ 22 सप्टेंबरला खुला होईल आणि 24 सप्टेंबरला बंद होईल. कंपनीने सांगितले की, आयपीओसाठी किंमत 305 ते 306 रुपये प्रति शेयरपर्यंत ठरवली आहे.

600 कोटी जमवण्याचे लक्ष्य
एंजल ब्रोकिंगचे लक्ष्य आईपीओच्या माध्यमातून 600 कोटी रुपये जमवण्याचे आहे. यामध्ये 300 कोटी रूपयांचे नवे शयर जारी करण्यात येतील. तर कंपनीचे प्रमोटर आणि अन्य शेयरधारकांना 300 कोटी रुपयांच्या शेयरची विक्री ऑफर करेल. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन सुमारे 120 कोटी रूपयांच्या शेयरची विक्री ऑफर करेल.

पैशांचे काय करणार कंपनी
या आयपीओद्वारे जमवलेल्या रक्कमेचा उपयोग कंपनी आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे आणि अन्य कॉर्पोरेट कामात करेल. एंजल ब्रोकिंग विस्तार देशाच्या 1,800 शहरात आणि अन्य ठिकाणी आहे. कंपनीच्या 110 पेक्षा जास्त शाखा आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अ‍ॅडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एसबीआय कॅपिटलला या आयपीओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. कंपनीचे शेयर बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील.

काय आहे आयपीओ
जेव्हा एखादी कंपनी किंवा सरकार पहिल्यांदा सर्व लोकांसमोर काही शेयर विकण्याचा प्रस्ताव ठेवते, तेव्हा या प्रक्रियेला आयपीओ म्हटले जाते. म्हणजे एंजल ब्रोकिंगचे आयपीओ सर्व लोकांसाठी बाजारात ठेवण्यात येतील. यानंतर गुंतवणुकदार एंजल ब्रोकिंगमध्ये शेयरद्वारे भागीदारी खरेदी करू शकतील.