इरफान खानची आठवण काढत भावुक झाली अँजेलिना जोली, म्हणाली – ‘त्यांच्या स्मित हस्याला आठवते’


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार इरफान खाननं बुधवारी (दि. 29) जगाचा निरोप घेतला आहे. 53 वर्षीय अभिनेता दीर्घकाळापासून कॅन्सरसोबत लढा देत होता. त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरू होते. 2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. यावर त्यावर त्यानं उपचारही घेतले होते. त्याच्या निधनानंतर जगभर शोक व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर आता अँजेलीना जोली हिनंही आपल्या भावना मांडल्या आहेत.

अँजेलीना आणि इरफान खान यांनी ए मायटी हार्ट या सिनेमात एकत्र काम केलं होत. इरफानच्या निधनानंतर तिनंही आपल्या भावना मांडल्या आहेत. यावेळी ती भावूकही झाली आहे. अँजेलीना म्हणते, “ते कलाकार म्हणून खूप सज्जन होते. यामुळं कोणताही सीन त्यांच्या सोबत करणं खूप सोपं जात असे. मला त्यांच्या वचनबद्धतेची आठण येते. तेवढंच जास्त मला त्यांची स्माईल आठवते. त्यांचे मित्र, कुटुंब, आणि भारतासहित जगभरातील त्यांच्या चाहत्यांप्रति माझी सहानुभूती.”

क्रिस प्रैट, ब्रायस डलास होवार्ड, नताली पोर्टमॅन सह अनेक हॉलिवूड कलाकारांनी इरफान खानच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. क्रिस पैट आणि इरफान खान यांनी ज्युरासिक वर्ल्ड या हॉलवूड सिनेमात एकत्र काम केलं होतं.