Angreji Medium Movie Review : काळजाला स्पर्श करतो इरफान खान आणि राधिका मदनचा सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आई-वडिल आपल्या मुलांसाठी काहीही करतात. त्यांच्या आनंदासाठी ते असा रस्ताही निवडतात ज्यात त्यांचं नुकसान असतं. मुलांचं काही चांगलं होत असेल तर ते एखादी गोष्ट करण्यासाठी क्षणाचाही विलंब लावत नाहीत. जेव्हा मुलं स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरा आणि कुटुंबीयांना सोडून दूर जाऊ इच्छितात तेव्हा आई-वडिलांना काय वाटतं. हे सगळं काही खूप हसत खेळत अंग्रेजी मीडियम सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

काय आहे स्टोरी ?

ही स्टोरी राजस्थानमधील चंपकची आहे. चंपक(इरफान खान) राजस्थानमधील प्रसिद्ध हलवाई घसीटारामचा नातू आहे. घसीटारामचं नाव वापरण्यासाठी दोन घरं आपापसात भांडत असतात. हे भांडण कायद्यानं सुरू असलं तरी त्यांच्यात प्रेमही असतं. चंपकनं मुलगी तारिणीला(राधिका मदन) एकट्यानंच लहानाचं मोठं केलेलं असतं. तिला ब्रिटनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असते. यासाठी त्याला अनेक पापड बेलावे लागले होते. यासाठी त्याची साथ देतो त्याचा चुलतभाऊ घसीटाराम बंसल (दीपक डोबरियाल). तारिणी स्वप्न पूर्ण होतं की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

डायरेक्शन

डायरेक्टर होमी अदजानियानं बाप-लेकीचं नातं चांगल्या प्रकारे पडद्यावर दाखवलं आहे. कायदेशरी लढाई लढणारे दीपक डोबरियाल आणि इरफान खान यांच्यातील नातंही खूप चांगल्या प्रकारे दाखवलं आहे. ज्या प्रकारे त्यानं नात्यांना मेटाफर सोबत जोडलं आहे ते कौतुकास्पद आहे.

अ‍ॅक्टींग

इरफान खान चंपक जैनच्या रोलमध्ये परफेक्ट दिसतो. दीपक डोबरियालानंही त्याला चांगली साथ दिली आहे. राधिका मदननंही चांगलं काम केलं आहे. तिचं अभिनय कौशल्य मन जिंकतं. कीकू शारदानंही कौतुकास्पद रोल केला आहे. कीकू त्या कॉमेडियनपैकी आहे जे उमदा अभिनयदेखील करतात. दीर्घकाळानंतर डिंपल कपाडियाला पडद्यावर पाहणं एक सुखद अनुभव आहे. अभिनयातील तिची सहजता पाहण्यासारखी आहे. करीनाचा सिनेमात जास्त रोल नाही दिसत.

एकूण सांगायचं झालं तर अंग्रेजी मीडियम हा सिनेमा हिंदी मीडियमएवढा सशक्त तर नाही परंतु हा सिनेमाला काळजाला स्पर्श करतो. दीर्घकाळाच्या आजारपणानंतर इरफान खान पडद्यावर दिसत आहे.