Angreji Medium Trailer : स्वप्नाची गोष्ट सांगणारा इरफान खानचा हा सिनेमा हसवतोही आणि रडवतोही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार इरफान खान, करीना कपूर आणि राधिका मदान स्टारर अंग्रेजी मीडियम सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात स्वप्नांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. एका मुलीचं स्वप्न जिला शिकायचं असतं. जिला पुढे जायचं असतं. परंतु नेहमीप्रमाणे पैसा आणि गरीबी तिच्या रस्त्यात आवडे येतात. पंरतु असं म्हणतात की, प्रमाणिकपणा, कष्ट आणि जिद्दी समोर कोणतीही अडचण जास्त काळ टिकत नाही. असंच काहीसं या सिनेमात पहायला मिळत आहे.

सिनेमात कॉमेडी आणि इमोशन अशी दोन्ही गोष्टी पहायला मिळत आहे. होमी अदजानियानं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. हा सिनेमा 20 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपक डोबरियालनं इरफान खानच्या मित्राची भूमिका साकरली आहे. करीना कपूरनं या सिनेमात लंडनच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

ट्रेलर रिलीजच्या एक दिवस आधी(दि 12 फेब्रुवारी रोजी) इरफान खाननं त्याचा आवाज दिलेला एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यानं आजारपणामुळं सिनेमाचं प्रमोशन करू शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यानं म्हटलं होतं की, मी येईल माझी वाट पहा. काळजाला स्पर्श करणारा इरफानचा हा व्हिडीओ हृतिक रोशन आणि वरुण धवन यांसारख्या कलाकरांनी सोशलवर शेअर केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like