जनता कर्फ्यु : रस्त्यावर लोकांचा जल्लोष पाहून अभिनेत्री पूजा बेदी प्रचंड ‘संतापली’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – भयंकर अशा कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि 22 मार्च 2020 रोजी) जनता कर्फ्यु लागू केला होता. सायंकाळी 5 वाजता त्यांनी कोरोना कमांडोंचे आभार मानण्यासाठी थाळी किंवा टाळी वाजवावी असंही सांगितलं होतं. 5 वाजता मात्र जनता रस्त्यावर उतरून जल्लोष करू लागली होती. काहींनी ताशा वाजवला. फटाकेही वाजवले. काहींनी नाचायलाही कमी नाही केलं. याचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले.

लोकांना असं रस्त्यावर येऊन जल्लोष करताना पाहून अभिनेत्री पूजा बेदी प्रचंड भडकली. पूजानं एक व्हिडीओ रिट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच तिनं बरंच काही लिहिलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये पूजा म्हणते, “आपल्याला आयसोलेशन आणि संक्रमण यांचा अर्थ कधी समजणार आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे. एका लॉकडाऊनचा अर्थच संपला. सोशल मीडिायवरील व्हिडीओ पाहिले तर लक्षात येईल की, हे पूर्ण भारतात झालं आहे. व्हिडीओत लोक रस्त्यावर नाचताना दिसत आहेत.”

भारतात कोरोनाचा कहर सलग वाढताना दिसत आहे. देशात अद्याप 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. बाधितांचा आकडा जवळपास 400 च्या पुढे गेला आहे. सध्या अनेक प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. ट्रेनची सुविधाही बंद करण्यात आली आहे.