‘बिग बी’ अमिताभ यांची ‘कोरोना’ कॉलर ट्युन ऐकून वैतागला CRPF जवान ! संतापाच्या भरात केलं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोणालाही कॉल केला, की अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची कॉलर ट्युन ऐकायला येते. तसं तर कोरोनाच्या (Corona) जनजागृतीसाठी ही कॉलर ट्युन आहे; परंतु अनेकजण या ट्युनमुळं वैतागले आहेत. एका सीआरपीएफ जवानानं तर थेट कस्टमर केअरलाच कॉल केला आणि अमिताभ बच्चन मला सल्ला देणारे कोण ? असा सवाल त्यानं केला आहे.

ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर तुफान व्हायरल
कॉल केल्यानंतर जी ट्युन ऐकायला येते त्यात अमिताभ बच्चन सांगतात, की कोरोनाबद्दलचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. परंतु त्यांचा हा सल्ला या जवानाला अजिबात रुचला नाही. त्यामुळं रागाच्या भरात त्यानं थेट कस्टमर केअरलाच कॉल केला. त्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

काय म्हणाला जवान ?
CRPF जवान असल्याचा दावा करणारी ही व्यक्ती म्हणते, “दिवसभरात जेव्हा कधी मी कॉल करतो तेव्हा अमिताभ बच्चन हात धुण्याबद्दल सांगत असतात. त्यामुळं मी त्रस्त झालो आहे. मला अमिताभ यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही. मला सल्ला देणारे ते कोण ? जी व्यक्ती स्वत: कोरोना पॉझिटीव्ह होती त्या व्यक्तीचा सल्ला मी का मानू ? अमिताभ यांचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह होतं. त्यामुळं मला सल्ला देण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. मी त्यांचा आवाज ऐकून वैतागलो आहे. मी हायकमांडपर्यंत ही गोष्ट नेऊ इच्छितो. तुम्ही हा प्रकार बंद केला पाहिजे. आम्ही त्यांचं म्हणणं का ऐकायचं ?”