रागाच्या भरात पत्नीनं कापला पतीचा ‘प्रायव्हेट’ पार्ट, म्हणाली – ‘लग्नानंतर…’

रांची : वृत्तसंस्था – लग्नानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे सुरू होती. याच भांडणातून गुरूवारी सकाळी पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट धारधार ब्लेडने वार करून कापून त्याला गंभीर जखमी केले. या पती-पत्नीमधील भांडणावरून मागच्या आठवड्यात पंचायतीची एक बैठकही झाली होती, अशी माहिती आहे.

प्रायव्हेट पार्ट कापल्याने गंभीर जखमी झालेल्या पतीला तातडीच्या उपचारांसाठी रांची येथे हलवण्यात आले आहे. मुकेशच्या पत्नीने तिच्यावरील हा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तिने म्हटले की, मला या प्रकाराबाबत काहीही माहिती नाही.

गंभीर जखमी झालेल्या मुकेश कुमार मंडलने सांगितले की, माझ्या पत्नीला माझ्या सोबत राहायचे नव्हते. यावरून आमच्या दोघांमध्ये सतत भांडणे सुरू होती. तीन-चार दिवसांपूर्वी पत्नीने माझे हात-पाय बांधले होते.

मुकेश मंडलने घटनेची माहिती देताना सांगितले की, गुरूवारी सकाळी माझे आणि पत्नीचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून तिने ब्लेडने माझा प्रायव्हेट पार्ट कापला. जखमी आवस्थेत मुकेशला बगोदर हरिहरधाम येथील पाटलावती नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. येथील डॉ. बी. एम. मिश्रा यांनी सांगितले की, मुकेशच्या प्रायव्हेट पार्टचे 6 लेयर कापण्यात आले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्याला रांचीच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

ही घटना बगोदर विधानसभा मतदारसंघातील नउवाडीह गावातील आहे. जे बिष्णुगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मिळालेल्या माहितीनुसार नउवाडीह येथे राहणारा मुकेश कुमार मंडल याचा विवाह बिष्णुगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच भुताही मुरगांवो गावातील एका 22 वर्षांच्या मुलीशी 30 जानेवारीला झाला होता.

You might also like