मुलीच्या प्रेम विवाहामुळं नाराज होते वडिल, उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमधील पटियाळामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी आपल्या मुलीने केलेल्या प्रेमविवाहामुळे चिडलेल्या वडिलांनी तिच्या सासरच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. त्याचबरोबर मुलाच्या वडिलांना देखील त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे तर अन्य आरोपी फरार आहेत. शिंगारा सिंग असे या आरोपी पित्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोख सिंग यांनी पोलीस स्थानकात सांगितले कि, ते पेंटरकाम करत असून त्यांनी चार वर्षांपूवी शिंगारा सिंग यांच्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला होता. त्यानंतर मे 2019 मध्ये त्यांच्यावर शिंगारा सिंग आणि त्यांच्या परिवाराने घरात घुसून हल्ला केला होता. यामध्ये ते स्वतः त्यांची आई आणि बहीण जखमी झाले होते. त्यानंतर पंचायतीमध्ये समझोता देखील झाला होता. मात्र त्यानंतर देखील शिंगारा सिंग यांनी त्यांना धमकावण्याचे तसेच शिव्या देण्याचे सुरूच ठेवले. त्यानंतर अनेक वेळा शिंगारा सिंग याने त्यांच्या घरासमोर येऊन अर्धनग्न अवस्थेत आंदोलन देखील केले तसेच शिव्यादेखील दिल्या. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र यानंतर देखील त्याच्या हरकती बंद न झाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील तपास सुरु असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –