‘ती’ बाथरूममध्ये गेली अन् पतीनं ‘चान्स’ साधला, मोबाईल हिसकावताच तिनं केलं ‘असं’ काही

कल्याण :  पोलीसनामा ऑनलाईन – पतीने मोबाइल हिसकावला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीच्या हाताला चावा घेतला. या प्रकरणी पतीने पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना कल्याणमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील खंडागळे सदन येथे दिलीप रेहनकर कुटुंबासह राहतात. शनिवारी सकाळी दिलीप यांच्या पत्नी नूतन या मोबाइल घेऊन बाथरूममध्ये गेल्या होत्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर दिलीप यांनी नूतन यांच्याकडे मोबाइल मागितला, मात्र नूतनने मोबाइल देण्यास नकार दिला मात्र  दिलीप यांनी हातातून मोबाइल घेतला, त्यामुळे संतापलेल्या नूतनने मोबाइल हिसकावून घराबाहेर जाऊन त्यांना शिवीगाळ केली. यावेळी दिलीप यांनी नूतन यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता नूतन यांनी दिलीप यांच्या हाताला चावा घेतला. या प्रकरणी दिलीप यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पत्नी नूतनविरोधात गुन्हा दाखल  केला आहे.

Visit : Policenama.com