पै.अभिजित कटकेची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी निवड

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – वाघोली (ता – हवेली) चे सुपुत्र पैलवान अभिजित कटके याची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे शहरात नुकत्याच झालेल्या निवड स्पर्धेनंतर पुणे शहर गादी विभागातून पै.अभिजित कटके चौथ्यांदा तयारीनिशी सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र केसरी २०१६ च्या अंतिम सामन्यात पै. अभिजीत कटके विरुद्ध पै. विजय चौधरी यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये विजय चौधरी विजेते झाले होते. २०१७ च्या अंतिम सामन्यात अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. २०१८ च्या अंतिम सामन्यात अभिजित कटके विरुद्ध बाला रफिक शेख यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये बाला रफिक शेख विजेते झाले होते. अभिजित कटके यावर्षी चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी मध्ये उतरणार असून पुणे येथील शिवराम दादा तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

बालेवाडी येथे २ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकविण्यासाठी वाघोलीसह शिरुर हवेली तालुक्यातील नागरिकांनी त्यांस शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/