भारतीय लष्करात निवड झाल्याबद्दल अनिकेत अढाईगेंचा शाळेकडून सत्कार

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) – मुरबाड शहरामध्ये अल्पावधीतच नावारुपाला आलेली हेरिटेज इंग्लिश मीडियम शाळा आणि इतर शाळेच्या तुलनेने हेरिटेज शाखेच्या शिक्षणाचा दर्जा वर्षांनुवर्षे वाढत चालला असून पालक वर्गात शिक्षणाच्या गुणवत्ते बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

नुकताच या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे, भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील, मुरबाड नगरपंचायत उपनगराध्यक्षा अर्चना विषे, आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेरिटेज इंग्लिश मीडियम स्कुलच्या या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाबा, ओमेरे पापा, मा ओमेरी मा, मै तेरा लाडला अशी वेगवेगळी गाणी, कला सादर करून पालक, शिक्षक, प्रेक्षकांचे मनं वेधून घेतली. सदर कार्यक्रम दोन संत्रात पार पडला असून उत्कृष्ट कलाकारी सादर करणाऱ्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे हेरिटेज इंग्लिश मिडीयम मध्ये पिटी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनिकेत अढाईगे यांची इंडियन आर्मी मध्ये नुकतीच निवड झाल्याने शाळेकडून खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

शाळेचे संस्थापक मुकेश विषे यांनी विविध छेत्रामध्ये वाटचाल, राज्यस्तरीय स्पर्थांमध्ये मुलांना वाव मिळावा याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नुपूर डे प्रिन्सिपल, पूनम पवार, आशा सिंग, तबला वादक निलेश घुडे यांनी विशेष मेहनत घेतली.