अनिकेत कोथळे खून प्रकरणात उपनिरीक्षक चव्हाण, शिपाई कांबळेवर ठपका

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रमुख संशयित बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पोलीस कोठडी मधून पळू गेल्याचा बनाव केला होता असा आरोप सीआयडीने त्यांच्या आरोप पत्रात केला आहे. याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समीर सुरेश चव्हाण,  शिपाई अक्षय नेमगोंडा कांबळे यांच्यावर आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B01EOQZ8XO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16c2733a-85e4-11e8-b6f8-034c51a42dd0′]

वाटमारीच्या आरोपावरुन सांगली शहर पोलीसांनी 5 नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना अटक  केली होती. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीत असताना तपास अधिकारी युवराज कामटे व त्याच्या सहकारी पोलीसांनी डीबी रुम मध्ये आणून अनिकेतवर थर्ड डिग्रीचा वापर केला होता. त्याला उलटे टांगून काठीने बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू झाला. या खुनात आपण अडकले जाऊ म्हणून  युवराज कामटे याने स्टेशन डायरीमध्ये दोघेही पळून गेल्याची तक्रार नोंदविली होती. पोलीस कोठडीतून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे लॉकअपमधून पळाल्याची कामटे याने तक्रार नोंदविली होती. त्यावेळी उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे पोलीस ठाण्याचा कार्यभार होता.

अनिकेतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह मोटारीतून घेवून कामटे व त्याचे सहकारी दोन तास फिरत होते. त्यावेळी मृतदेहसोबत शिपाई अक्षय कांबळे तीन तास होता. त्याने या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. कामटे आणि त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधूदुर्ग) येथे नेवून जाळला व ते दोघे पळून गेल्याचे भासविण्यात आले. दुसर्‍या दिवशी कामटे व त्याच्या सहकारी पोलीसांनी तसेच वातावरण करण्यात आले. या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी पोलीस उपनिरीक्षक समीर चव्हाण व शिपाई अक्षय कांबळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले होते.

याप्रकरणी अनिकेत कोथळे याचा खून व ते दोघे लॉकअप मधून पळून गेल्याचे स्वतंत्र गुन्हे दाखल आहे. सीआयडी या दोन्ही गुन्ह्याचा तपास करत आहे. दोघे लॉकअपमधून पळून गेल्याच गुन्ह्याचा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला.
[amazon_link asins=’B07DL5B2CL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e9a3373-85e4-11e8-8d02-6fa190212b8e’]

युवराज कामटेची तक्रार खोटी

अनिकेत कोथळे व अमोल भंडारे लॉक अपमधून पळून गेल्याची युवराज कामटे याची तक्रार खोटी आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी कामटे याने त्याच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केला व स्वत:च्या फायद्याकरीता बनावट कागदपत्रे तयार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक गीता बागवडे, बाळासाहेब पवार, राकेश इंदुलकर, अमोल ठाकूर आदींनी आरोपपत्र तयार करण्यासाठी प्रयत्न केले.