अनिकेत कोथळे आणि हिवरे खून प्रकरणाची सुनावणी

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडी ने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले . या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु आहे. या सुनावणीकरिता विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम सोमवारी सांगलीत येत आहेत. कोथळे खून प्रकरणासह हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याच्या सुनावणीसाठी ते सांगलीत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेवर थर्ड डिग्री वापरून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकऱणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर 5 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.

मार्चमध्ये त्यावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाकडे हा खटला वर्ग करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. निकम यांची शासनाने नियुक्ती केली आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठीच ते सोमवारी सांगलीत येत आहेत.

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B06WLLY4GS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1119600c-b427-11e8-92fc-734d20192462′]
दरम्यान सोमवारी हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याचीही सुनावणी होणार आहे. त्याही सुनावणी उपस्थित रहाणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

कोथळे खूनप्रकऱणी यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीला ते उपस्थित होते. त्यावेळी पोलिस शिपाई राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी उपस्थित होते. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी दोघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला होता.