अनिल अंबानी मोठया संकटात, 3 बँकांनी 48.53 अरब रूपयांसाठी दाखल केला खटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. त्यांच्यावर आता चीनच्या तीन बँकांनी लंडनच्या एका न्यायालयात 68 कोटी डॉलर (48.53 अरब रुपये) देण्याचा खटला दाखल केला आहे. 2012 साली इंडस्ट्रीयल अॅण्ड कमर्शल बँक ऑफ चायनाच्या मुंबईच्या शाखेने आणि चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट – इंपोर्ट बँक ऑफ चायनाने अनिल अंबानींच्या फर्म रिलायन्स कम्युनिकेशनला एका खासगी गॅरंटीच्या अटीवर 92.52 कोटी रुपयांचे (66.03 अरब रुपये) कर्ज दिले होते. ही माहिती आयसीबीसीचे वकील बंकिम थांकी यांनी न्यायालयात दिली. बँकेने सांगितले की अंबानी यांनी फेब्रुवारी 2017 पासून बँकेचे हप्ते फेडले नाहीत.

या संबंधित अंबानींचे म्हणणे आहे की, त्यांनी कर्जावेळी कोणती खासगी संपत्ती गॅरंटी म्हणून ठेवली नव्हती. मागील काही दिवसांपासून अंबानी आर्थिक कारणाने अडचणीत आहेत. देशातील श्रीमंत लोकांच्या यादीत ते खूपच मागे पडले आहेत. तर त्यांचे भाऊ मुकेश अंबानी 56 अरब डॉलरची संपत्ती असल्याने अशियातील सर्वात मोठे श्रीमंत आणि जगातील 14 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.

अनिल अंबानीवर अजूनही चार कंपनींचे 93,900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात 700 कोटी कर्ज रेड नेवल अॅण्ड इंजिनिअरिंगचे आहे. जर आर कॅपवर सर्वात जास्त 38,900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यानंतर नंबर लागतो तो रिलायन्स पॉवरचा. या कंपनीवर 30,200 कोटी रुपयांचे कर्ज आहे याशिवाय रिलायन्स इंफ्रावर 17,800 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

गुरुवारी न्यायालयात सुनावणी दरम्यान ICBC च्या वकिलांनी न्यायाधीश डेविड वाक्समॅन यांना सांगितले की अंबानींनी एका शर्त आदेशाच्या सुविधा करारानुसार संपूर्ण रक्कम आणि व्याजाची भरपाई करावी. परंतू अंबानींनी आपल्या संपत्तीचा पुरावा देण्यास नकार दिला आहे.

Visit : Policenama.com