अरे देवा ! काय ही परिस्थिती ? अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे लागले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली आहे की, न्यायालयीन खटले लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले अनिल अंबानी यांनी लंडन मधील कोर्टात ही माहिती दिली. करोडपती ते रोडपती असा त्यांचा प्रवास औद्योगिक साम्राज्य खालसा झाल्याचं दर्शवत आहे.

इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्जिम बँक ऑफ चायनाने अनिल अंबानी यांना ४ हजार ७६० कोटींचे कर्ज दिल होते. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमध्ये खटला दाखल केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी अनिल न्यायालयात सांगितले की, ‘मी एक सामान्य जीवन सामान्य जगत असून एकच गाडी वापरत आहे. पूर्वीसारखे माझे आयुष्य राहिले नाही. तसेच न्यायालयीन खटल्यांचा खर्च हा पत्नीचे दागिने विकून केला’ असल्याची कबुली त्यांनी दिली. ‘मागील सहा महिन्यांपासून पत्नीचे ९ कोटी ९० लाख रुपयांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःपशी किंमती ऐवज उरलेला नाही, असेही अंबानी यांनी न्यायालयात म्हटले.

अनिल अंबानी यांनी सुनावणीवेळी माध्यमांवर खापर फोडत माझ्या श्रीमंतीबाबत अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयल ही मोटार नव्हती. केवळ माझ्याकडे एकच कार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्या संपत्तीबद्दल माहिती विचारण्यात आली. यापूर्वी २० मे २०२० रोजी झालेल्या सुनावणीत युके हायकोर्टाने अंबानी यांच्या संपत्तीचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. १२ जून पर्यंत अंबानी यांच्यावर चिनी बँकांचे ५२८१ कोटींचे कर्ज आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांचा न्यायालयीन खर्च सुद्धा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. १५ जून रोजी बँकांनी देखील अंबानी यांच्या संपत्तीचा खुलासा करण्याची मागणी केली होती.

भारतात देखील अंबानींच्या अडचणीत वाढ

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (ADAG) चे मालक यांच्याविरोधात नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने (NCLT) दिवाळखोरीची कारवाई सुरु केली आहे. २०१६ साली रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इफ्राटेल ने भारतीय स्टेट बँक इंडियाकडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी अंबानी यांनी १ हजार २०० कोटींची पर्सनल गॅरेन्टी दिली होती. दरम्यान, आता दोन्ही कंपन्यां बंद पडल्या आहेत. म्हणून sbi ला मुंबई NCLT कडे अपील करावी लागली.