कर्ज बुडवणारे अनिल अंबानी, चंद्रा ED च्या रडारवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येस बँक आर्थिक घोटाळ्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ११ मोठ्या उद्योग समूहांवर लक्ष केंद्रित केले असून, या ११ उद्योग समूहांनी बँकेकडून ४२ हजार १३६ कोटीचे रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले आहे. यात परदेशी रक्कमेचा गैरवापर होऊन ‘मनी लॉन्डरिंग’ केल्याचा अंमलबजावणी संचालनाचा (ED) संशय आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED)  घोटाळ्याच्या चौकशीसाठी अटक केली आहे. कपूर यांनी परदेशी पैशाचा गैरवापर करत उद्योग समूहांना कर्ज देण्यात आल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. मात्र ते कर्ज आता बुडीत खात्यात गेल्याने या उद्योग समुहांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता लक्ष केंद्रित केले असून, त्यांची चौकशी सुरु झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनिल अंबानी यांना समन्स

दरम्यान आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल अंबानी यांना समन्स दिला आहे. बँकेने सर्वाधिक १२ हजार ८०८ कोटींचे कर्ज अनिल अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी या समूहातील दहा कंपन्यांना हे कर्ज देण्यात आली आहे. ती सर्व कर्जे आता बुडीत खात्यात गेली. एस्सेल समूहाच्या १६ कंपन्यांना देखील बँकेने ८४१५ कोटींचे कर्ज दिले होते. जेट एअरवेज ही विमानसेवा कंपनी अलीकडेच आर्थिक संकटामुळे बंद पडली आहे. कंपनीवर ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यातील ११०० कोटी हे त्यांनी येस बँकेकडून घेतले होते. त्यात कंपनीचे संस्थापक नरेश गोयल व त्यांची पत्नी यांनी परदेशी पैशाचा गैरवापर केल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात जेटएअर वेजची अंमलबजावणी संचालनालयन (ED) नव्याने कशाप्रकारे चौकशी करणार हे औत्सुक्याचे आहे.

या व्यतिरिक्त दिवाण हौसिंग फायनान्स कंपनी (डीएचएफएल), आयएल अँड एफएस समूह, इंडिया बुल्स, खेतान समूह यांनाही बँकेकडून कर्ज देण्यात आली होती. या सर्व खात्यांचा बुडीत कर्जखात्यांमध्ये समावेश केला आहे. जाणून घेऊया कोणाला किती कर्ज देण्यात आली.

कंपनी – रुपये (कोटी रुपयांत)

अनिल धीरूभाई अंबानी समूह – १२८०८

एस्सेल समूह – ८४१५

जेटएअरवेज – ११००

इंडिया बुल्स – ५८००

डीएचएफएल – ४७३५

ओमकार – २७१०

आयएल अँड एफएस समूह – २५६८

खेतान – १२५०

रेडियस – १२००

केळकर – १०५०

थापर – ५००

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like