आश्चर्यकारक ! ‘उद्योग’पती अनिल धिरूभाई अंबानी आता ‘करोडपती’ नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ‘ब्लूमबर्ग’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी यांची संपत्ती ४२ अब्ज डॉलरवरून आता ०.५ अब्ज डॉलर इतकी कमी झाली आहे. २९३३ अब्ज रुपयांवरून त्यांची संपत्ती ३४ अब्ज रुपयांवर आली आहे.

२००८ साली अनिल अंबानी हे जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यानंतर मागील ११ वर्षात त्यांच्या संपत्तीत प्रचंड घट झाल्याने त्यांची संपत्ती आता फक्त ३६५१ अब्ज रुपये इतकीच राहिली आहे. त्यांच्या उद्योग समूहावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्यांनी आपल्या अनेक कंपन्या विक्रीस काढल्या होत्या. त्यामुळे त्यांचा उद्योगसमूह मोठ्या प्रमाणात तोट्यात गेला आहे.

दरम्यान,चार महिन्यांपूर्वी त्यांच्या कंपनीची संपत्ती आठ हजार कोटी रुपये इतकी होती. त्याचबरोबर त्यांच्या उद्योगसमूहावर १. ७ लाख करोड रुपयांचे कर्ज आहे. ज्यातील त्यांनी मागील १४ महिन्यांत ३५ हजार कोटी रुपये कर्ज फेडले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी ” डोळ्याची ” काळजी

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !