अनिल अंबानी दिवाळखोरीत ! दिल्लीतील रिलायन्स इन्फ्राच्या विक्रीची ‘नामुष्की’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनिल अंबानी यांच्या समोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अंबानी दिवाळखोर झाले असून बँकांची कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. अंबानी दिल्लीतील वीज पुरवठा करणारी रिलायन्स इन्फ्रामधील हिस्सा विक्री करणार आहे. रिलायन्स इन्फ्राच्या दिल्लीतील व्यवसायासाठी इटलीतील एनेल ग्रुप इच्छुक आहे. त्याशिवाय ग्रनको आणि टोरंट पॉवर या दोन कंपन्यांनी लिलावात सहभाग घेतला.

रिलायन्स समूहाचे बाजार मूल्य 5000 कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कंपनीने लिलावासाठी केपीएमजी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स इन्फ्राची बईएसईएस राजधानी पॉवर आणि बीएसईएस यमुना पॉवर या दोन कंपन्यामध्ये 51 टक्के हिस्सेदारी आहे. तर उर्वरित 49 टक्के हिस्सा दिल्ली सरकारचा आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या दोन कंपन्यांकडून दिल्लीतील सुमारे 93 टक्के ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.

अदानी समूह लिलावापासून लांब
दोन वर्षापूर्वी अंबानी यांनी मुंबईतील वीज वितरण व्यवसाय अदानी ट्रान्समिशन या कंपनीला 18800 कोटीला विक्री केला होता. मात्र, दिल्लीतील विक्री लिलावात अदानी समूहाने चार हात लांब राहणे पसंत केले. नुकताच लंडनमधील न्यायालयाने अनिल अंबानी यांनी चिनी बँकांची देणी लवकरात लवकर फेडण्याचे आदेश दिले होते. कर्जफेड न केल्यास तुरुंगात टाकण्याचा निर्वाणीचा इशारा न्यायालयाने अंबानी यांना दिला होता. त्यानुसार अंबानी यांनी पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

चीनमधील बँकेकडून 4760 कोटीचे कर्ज
अंबानी यांनी चीनमधील बँकेकडून 4760 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. अंबानी यांचे वकिल रॉपर्ट यांनी मागच्या सुनावणीत युक्तीवाद करताना भारतातील दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील घडामोडींमुळे अंबानी हे देशोधडीला लागले असल्याचा दावा केला होता.

अंबानींच्या वकिलांचा युक्तीवाद
अंबानी यांच्या वकिलाने न्यायालायत सांगितले की, दूरसंपर्क सेवा बाजारपेठेतील विपरीत घडामोडींमुळे अंबानी आता धनाढ्य नाहीत. त्यांच्याकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुटुंबियांकडून अंबानी यांना मदत मिळणार नाही, असे अंबानी यांच्या वकिलाने कोर्टात स्पष्ट केलं होतं. मात्र, नव्याने झालेल्या सुनावणीत अंबानी यांना कोर्टाने निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like