नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Bonde | राज्यात ईडीचे (ED) धाडसत्र चालू असून मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली. या कारवाईमध्ये श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांचे 11 फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी चालू आहे. अशातच भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची धाड (ED Raid) पडल्यानंतर आता मातोश्रीच्या (Matoshree) दरवाजे, खिडक्या हलायला लागल्यात. कारण हे सगळं मूळ मातोश्रीपर्यंत पोहोचलं आहे. कारण काल मुख्यमंत्री देखील अस्वस्थ झाले. काल स्वत: गाडी चालवत ते मातोश्रीवर गेले आणि आजही एवढी हालचाल आहे की त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना (Shivsena MLA) भोजनासाठी बोलावलं. यामधून दिसून येतं की अस्वस्थता राहिलेली नाही, असं अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले.
सरकार केव्हा पडेल, हे काही मला माहिती नाही. सरकार कधी पडेल हे सांगायला मी काही ज्योतिषी (Astrologer) नाही,
पण सर्वसामान्यांना आता भाजपचं सरकार कधी येईल, असं वाटू लागलंय, हे मात्र नक्की, असंही अनिल बोंडे म्हणाले.
दरम्यान, भ्रष्टाचाराने (Corruption) दलदलीत फसलेल्यांना सातत्याने भीती वाटते की उद्या कुणाचा नंबर लागेल,
उद्या कोण आतमध्ये जाईल, असं म्हणत बोंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
बोंडेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Anil Bonde | maharashtra ex minister anil bonde attacked cm uddhav thackeray over ed action against shridhar patankar nilambari project pushpak bullian
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update