Anil Desai | नारायण राणेंची कॅबिनेटपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (modi cabinet reshuffle) करण्यात आले. अनेकांच्या पायउतार व्हावे लागले असून अनेकांना अनपेक्षित धक्काही बसला आहे. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) आणि कपिल पाटील (Kapil Patil) यांचा समावेश आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक समजले जाणारे नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. त्यांच्याकडे सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग या खात्याची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान नारायण राणेंना मिळालेल्या खात्यावरून शिवसेनेने खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राणे केंद्रात मंत्री झाल्याने शिवसेनेला कोकणवासीय अंतर देतील असे म्हणण्यात काही अर्थ नाही. येत्या काळात कोण कुणाला अंगावर घेत हे तुम्ही बघाल असे त्यांनी म्हंटले आहे. Anil Desai | modi cabinet reshuffle bjp narayan rane minister shivsena anil desai first reaction

अनिल देसाई म्हणाले. कोकण आणि शिवसेना (Shivsena) हे नेहमीच समीकरण राहील आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने (BJP) नारायण राणेंना केंद्रात स्थान दिले असे बोलले जाते पण हा शह वगैरे काही नाही. येणाऱ्या काळातच कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकणवासिय आणि शिवसेनेमध्ये कधीही अंतर पडणार नाही, असा दावाही अनिल देसाई यांनी केला आहे.

Web Title : Anil Desai | modi cabinet reshuffle bjp narayan rane minister shivsena anil desai first reaction

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Online Class | ऑनलाइन क्लासमध्ये कपलचा सेक्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Jammu And Kashmir । जम्मू कश्मीरमध्ये अवघ्या 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; ‘हिजबुल’च्या टॉपच्या कमांडरलाही कंठस्नान

Maharashtra political News | मुंबई, कोकणमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेनेला शह देण्याची भाजपची रणनीती