Anil Deshmukh | ED चा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘मुंबईतल्या 10 बार मालकांनी अनिल देशमुखांना 3 महिने 4 कोटी रुपये दिले’

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama Online) – 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर शुक्रवारी (दि. 25) सकाळी ईडीने (ED) छापे टाकले आहेत. दरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी सलग 3 महिने देशमुखांना 4 कोटी रुपये दिल्याचे पुरावे ईडीच्या (10 bar owners in Mumbai paid 4 crore to Anil Deshmukh) हाती लागले आहेत. त्याच आधारे देशमुखांच्या घरांवर ईडीने (ED) छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. 10 bar owners mumbai paid rs 4 crore anil deshmukh three months ed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांनी केला होता. या प्रकरणी देशमुखांची सीबीआय (CBI) चौकशी सुरू आहे. यात पैश्यांच्या व्यवहारातील धागेदोरे शोधण्यासाठी ईडीने या प्रकरणात उडी घेतली आहे. ईडीकडून आज सकाळपासून चार विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानाचा समावेश आहे देशमुख यांच्या निवासस्थानासोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या घरावरही छापा टाकला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील 10 बार मालकांचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. यात ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. मुंबई पोलीस दलातून (Mumbai Police Force) निलंबीत केलेल्या सचिन वाझेंने मुंबईतील बार मालकांकडून दरमहा 40 ते 50 लाख वसूल केल्याचा आरोप आहे.

Web Title :- Anil Deshmukh | 10 bar owners mumbai paid rs 4 crore anil deshmukh three months ed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’