Anil Deshmukh | कालच भाजपनं अजित पवारांविरोधात सीबीआय चौकशीचा ठराव केला मंजूर, आज अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – 100 कोटींच्या वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील घरावर ईडीने ( ED) छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी (दि. 25) सकाळी पावणेआठ पासून देशमुखांच्या घरी ईडीकडून 5 अधिका-यांमार्फत झडाझडती सुरू आहे. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात केले होते. या कारवाईमुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सीबीआय (CBI) चौकशीचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशमुखांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग(Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांनी
सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप करून
राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार
सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने
तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली आहे.
यापूर्वी सीबीआयने (CBI) देशमुखांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही घरावर धाड टाकली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

हे देखील वाचा

Pimpri News | धक्कादायक ! आयसीयुमधील बाळाला ऑक्सिजन कॉक बंद करून जीवे मारण्याचा प्रयत्न, डॉक्टर पिता-पुत्रासह तिघांवर FIR

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | after bjp demands ajit pawar cbi enquiry anil deshmukh raided by ed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update