Advt.

Anil Deshmukh | दिलासा नाहीच ! अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) जवळपास 80 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान आज न्यायालयाकडून देशमुख यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

 

10 जानेवारीला न्यायालयानं देशमुखांच्या कोठडीत 10 दिवसांची वाढ केली होती. त्यानुसार आज (गुरूवारी) त्यांची कोठडी संपणार होती. परंतु, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. सध्या अनिल देशमुख हे ऑर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Prison) आहेत. दरम्यान, मंगळवारी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज फेटाळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) दिला होता. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र देशमुखांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. आता देशमुख यांना आणखी 14 दिवस तुरूंगातच राहावं लागणार आहे.

 

दरम्यान, मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते.
त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली.
देशमुख बरेच दिवस अज्ञातवासात होते. शेवटी ते स्वतःच ED कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

 

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh custody increased 14 days by court in money laundering case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना

 

BMC Mayor Kishori Pednekar | ‘राणीच्या बागेतील हत्तीच्या पिल्लाचं नाव ‘चिवा’ अन् माकडाचं नाव ‘चंपा’ ठेवू’ – महापौर किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर

 

Urfi Javed | उर्फी जावेदने साडी उतरवून जाळीच्या ब्लाउजमध्ये अशी दिली बोल्ड पोज; सोशल मीडियावर उडाली खळबळ