Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना न्यायालयाकडून झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया (Surgery) करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज कोर्टात सादर करण्यात आला होता. अनिल देशमुख यांच्या या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने देशमुख यांना परवानगी नाकारली आहे.

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे (Mumbai Sessions Court) केली होती. दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने अनिल देशमुख यांना झटका दिला आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयातच (J.J. Hospital) उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उपचार करताना घरातील एक व्यक्ती देशमुख यांच्यासोबत उपस्थित असणार आहे, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

दरम्यान, जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे.
त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे केली होती.
पण, ईडीनं (ED) याला विरोध केला होता. देशमुखांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही, असा अहवाल ईडीने कोर्टात सादर केला होता.
त्याचबरोबर खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असा दावाही ईडीने केला होता.

 

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh not relieved by court treatment at jj hospital orders from court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा