Anil Deshmukh | विदर्भातील उमद्या नेत्याची कारकीर्द अटकेने ‘काळवंडली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | विदर्भातील एक उमदा नेतृत्त्व म्हणून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वर्णन केलं जायचं. त्यांची कारकीर्द ही निश्चितच प्रेरणादायी आहे. कारण कोणतही सरकार आल तरी एक अपवाद सोडला तर त्यांच्या डोक्यावर लाला दिवा कायम राहिला आहे. पण आता ईडीने (ED) अटक केल्यानंतर विदर्भातील या उमद्या नेत्याची कारकीर्द काळवंडली आहे.

नरखेड (Narkhed) तालुक्यातील वडविहिराचे असणारे अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे सख्खे चुलत भाऊ. गावात, काटोलमध्ये आणि नागपुरातही दोघांची घर आजूबाजूला. रणजित देशमुखांच्या (Ranjeet Deshmukh) सावलीतच अनिल देशमुख १९९२ मध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य झाले अन् नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ही. त्यानंतर १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख इच्छूक होते. पण काँग्रेसने तत्कालिन आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली.त्यामुळे अनिल देशमुख यांनी बंड पुकारले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांची निशाणी होती, गॉगल. त्यावेळी गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा.. हे गाणे लोकप्रिय होते. या गाण्याने काटोल प्रचारात धूम उडवली अन अनिल देशमुख निवडून आले. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला ३५ अपक्ष आमदारांचा टेकू मिळाला अन् अनिलबाबू शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री झाले. १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीतर्फे जिंकले आणि मंत्री झाले. तेव्हापासून एक वर्षाचा अपवाद वगळता ते कॅबिनेट मंत्री राहिले. उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक उपक्रम अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत.

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलली. भाजपने काटोल मध्ये (katol) रणजित देशमुखांचे पुत्र आशिष देशमुख (ashish deshmukh) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काका-पुतण्याची लढाईची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरु झाली. यामध्ये पुतण्याने बाजी मारली. त्यानंतर पाच वर्षे अनिल देशमुख यांनी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. पुढे आशिषने भाजपचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत काटोलची जागा राष्ट्रवादीला गेली आणि अनिल देशमुख रिंगणात उतरले. दरम्यानच्या काळात म्हणजे उमेदवारी मिळायच्या आधी काही दिवस त्यांच्या कार्यक्रमांतून घड्याळाचे बॅनर गायब झाले होते.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) राष्ट्रवादी सोडणार अशीही चर्चा रंगली पण त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडायची नाही असे ठरवले. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सलिल (Salil Deshmukh) यांची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती पण वडिलांच्या इच्छेखातर ते थांबले. आशिष, रणजितबाबू, काटोल शहरातील अनिलबाबूंचे प्रतिस्पर्धी राहुल देशमुख (Rahul Deshmukh) असे सगळे दिमतीला होते. मतदार संघात अनिल देशमुख यांच्याबाबत सहानभूती होती. त्यामुळे ते बिनदिक्कतपणे निवडून आले.

Gold Silver Price Today | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर काय आहे सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार शिगेला पोहोचला होता. त्यावेळी मुंबईवरून आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अनिल देशमुख यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, असं म्हंटल होत. आणि पुढे चमत्कार झाला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. अनिल देशमुखांची भविष्यवाणी खरी ठरली. सरकार स्थापनेनंतर गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आल्यानंतर चर्चा सुरू झाली की गृहमंत्री कोण होणार? अजित पवार, जयंत पाटील की दिलीप वळसे? पण या गर्दीत अनिल देशमुख डार्कहॉर्स ठरले, वयाच्या सत्तरीत त्यांना अत्यंत महत्त्वाचं गृहमंत्री खात मिळाल.

कोरोना काळामध्ये अनिल देशमुख एखाद्या योद्ध्यासारखे राज्यभर फिरले.
त्यांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्याचे काम केले. अनेक धाडसी निर्णय ही घेतले.
दरम्यान उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके सापडली, मनसुख हिरेनची हत्या झाली अन् अनिल देशमुखांचे ग्रह बदलले.
त्यातच कमी म्हणून आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेल्या परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचा लेटर बॉम्ब फोडला.
याची गंभीर दाखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले.
त्यानंतर ५ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.
सीबीआय, ईडीच्या फेऱ्यात अनिल देशमुख अडकले अखेर सोमवारी त्यांना अटक झाली.

हे देखील वाचा

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | anil deshmukhs journey zilla parishad home minister and now eds custody know whole story

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update