Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्या मुलाने ED ची चौकशी टाळली, ऋषीकेश यांना वाटतेय ‘ही’ भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money laundering case) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने आज (शुक्रवार) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी हा समन्स टाळला. दरम्यान, ऋषीकेश यांना अटकेची भीती वाटत असून ते कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी (pre-arrest bail) अर्ज करणार आहेत.

 

ऋषिकेश देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंग (Advocate Chandrapal Singh) यांनी यांनी याबाबत माहिती दिली.
ईडीने ऋषिकेश यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते हजर झालेले नाहीत.
त्यांच्यापुढे जे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा ते वापर करणार आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी आम्ही सत्र न्यायालय (Sessions Court) किंवा मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) अर्ज करणार आहोत, असे इंदरपाल सिंग यांनी सांगितले.

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा अर्ज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित आहे.
तिथे ईडीने प्रतिज्ञापत्र देताना केवळ चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते.
त्यानुसार देशमुख हे चौकशीसाठी हजर झाले असताना त्यांना अटक करण्यात आली.
ही बाब लक्षात घेता ऋषिकेश यांनाही अशी अटक होण्याची शक्यता आहे.
असे आम्हाला वाटत असून त्यासाठीच आम्ही कायदेशीर बाबी तपासून पाहत आहोत, असेही इंदरपाल सिंह यांनी सांगितले.

 

Web Title : Anil Deshmukh | anil deshmukhs son Rishikesh skips ed summons to move court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारची आणखी एक दिवाळी भेट, खाद्यतेलाच्या किमतीही होणार कमी

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 886 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मोठा धक्का ! आर्यन खान, नवाब मलिकांच्या जावयाच्या केससह 6 प्रकरणांचा तपास मुंबई झोनकडून काढला; पण…