Anil Deshmukh | देशमुखांचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाने जामीनावरील स्थगिती वाढवली

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन दिला होता. या जामीनावर सीबीआयने (CBI) आक्षेप घेत स्थिगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) केली होती. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. त्यानुसार न्यायालयाने अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) जामिनाला (Bail) दहा दिवस स्थिगिती दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे.

अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) जामीनावरील स्थगिती आता 27 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीआयने उच्च न्यायालयात ही विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) हे नाताळनिमित्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद आहे, त्यामुळे सुनावणी होत नाही. त्यामुळे आणखी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. यावर हायकोर्टाकडून आणखी दहा दिवस वाढवून देण्यात आले आहे.

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक (Justice Makarand Karnik) यांच्या एकलपीठाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पैश्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी 12 डिसेंबर रोजी जामीनावर सुटका केली होती. मात्र, न्यायालयाने स्वत:च्याच आदेशावर दहा दिवस स्थगिती दिली. शुक्रवारी सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु सुनावणी जानेवारी 2023 मध्ये ठेवली.

सीबीआयतर्फे अतिरिक्त महान्याअभिकर्ता अनिल सिंग (Anil Singh) यांनी न्यायालयाला सांगितले,
सर्वोच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायालय बसत नसल्याने जानेवारीपर्य़ंत पर्याय नाही.
त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती 3 जानेवारीपर्यंत कायम करावी.
यावेळी देशमुख यांचे वकील अ‍ॅड. अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी आक्षेप घेतला.
त्यावर न्यायालयाने सिंग यांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले.

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukhs stay in jail despite bail high court extended the stay on bail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Airport | विमान प्रवासासाठी विमानतळावर 3 तास आधी पोहोचा, विमानतळ व्यवस्थापनाकडून आवाहन

Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंना 19 बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल – किरीट सोमय्या