Anil Deshmukh | अखेर अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने फेटाळली CBI ची ‘ती’ विनंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढविण्याची याचिका सीबीआयने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयाने निकाल दिला. सुट्टीकालीन न्यायालयाच्या खंडपीठाने सीबीआयची याचिका फेटाळली. यामुळे सुमारे १ वर्षापेक्षा अधिक काळ तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपातून अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) याअगोदरच मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. परंतु त्याबाबतचा आदेश स्थगित असल्याने त्यांचा मुक्काम २७ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आला होता. कारण जामिनाला स्थगिती देणाऱ्या आपल्या आदेशाची मुदत उच्च न्यायालयाने वाढवली होती. अनिल देशमुखांना कोर्टाकडून दिलासा मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यासाठी जमण्यास सुरूवात केली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ४ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळून देखील सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणात जामीन न मिळाल्याने देशमुख तुरुंगातच राहिले. १२ डिसेंबर रोजी न्या. मकरंद कर्णिक यांनी सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, अपील करायचे असल्याचे सांगत सीबीआयने देशमुखांचा (Anil Deshmukh) जामीन स्थगित ठेवण्याची विनंती केल्याने न्यायमूर्तींनी आपला आदेश दहा दिवसांसाठी स्थगित ठेवला होता.

दरम्यानच्या काळात सीबीआयने अपील देखील दाखल केले होते.
मात्र, याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला हिवाळी सुट्टी लागली असून सुनावणीसाठी विशेष सुट्टीकालीन खंडपीठही उपलब्ध नाही, असे सांगत स्थगितीची मुदत ३ जानेवारीपर्यंत वाढवावी, असा अर्ज सीबीआयने केला होता.
या अर्जाला देशमुख यांच्यातर्फे अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
‘सीबीआयच्या अर्जाला कायदेशीर तरतुदीचा आधार नाही. शिवाय १० दिवसांची मुदत असूनही सीबीआयने विलंबाने म्हणजे १६ डिसेंबरला अपील दाखल केले.
यापूर्वी सीबीआयने अनेक प्रकरणांत तत्काळ अपील दाखल केल्याची उदाहरणे आहेत.
शिवाय तातडीची प्रकरणे ऐकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात रजिस्ट्रारची नियुक्ती केलेली असूनही सीबीआयने
त्याचा उपयोग करून घेतला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात असा अर्ज करणे म्हणजे न्यायप्रक्रियेचा
दुरुपयोग आहे,’ असा युक्तिवाद अनिल देशमुखांचे (Anil Deshmukh) वकील अ‍ॅड. निकम यांनी केला होता.

यावर ‘सर्वोच्च न्यायालयात कधी सुनावणी होऊ शकेल?’, असा प्रश्न न्यायमूर्तींनीही उपस्थित केला.
अखेर तपाससंस्थेला पुढील पाच दिवसांत प्रयत्न करू द्यावेत,
अशी विनंती केंद्र सरकारचे अतिरिक्त न्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी केली होती. त्यानंतर यावर भाष्य करताना,
अखेरची संधी देत असून यापुढे अशा प्रकारच्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही,
असे स्पष्ट करत न्यायमूर्तींनी २७ डिसेंबरपर्यंत आपला स्थगिती आदेश वाढवला होता.

सीबीआयची वाढीव मुदतीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे आता अनिल देशमुखांच्या
(Anil Deshmukh) सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title :- Anil Deshmukh | big relief to ncp leader anil deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Salman Khan | सलमान खान व एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत, वेधले सगळ्यांचे लक्ष

Rakhi Sawant | “महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतने केला मोठा खुलासा

Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर, मात्र उद्धव ठाकरेंची ‘ती’ मागणी नाकारली