Anil Deshmukh | मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दणका ! पुन्हा ED च्या कोठडीत रवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मोठा दणका बसला आहे. शनिवारी सत्र न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. न्यायालयाच्या त्या निर्णयाला ईडीनं (ED) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने आता अनिल देशमुख यांना पुन्हा ईडीची कोठडी (Enforcement Directorate custody) सुनावली आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Bombay High Court remands Maharashtra's former home minister Anil Deshmukh to Enforcement Directorate custody till 12th November
He was arrested on Nov 1 in a money laundering case.
(file photo) pic.twitter.com/B1XD1BrqfA
— ANI (@ANI) November 7, 2021
ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कोठडी मिळावी म्हणून धाव घेण्यात आली होती. ईडीने (ED) केलेली मागणी ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी सुनावली आहे. सलग 13 तास तपास करून दि. 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक केली होती. अटकनंतर ईडीनं दि. 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी न्यायालयाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं. शनिवारी (दि. 6) कोठडीची मुदत संपल्यानं अनिल देशमुख यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं.
न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. मात्र, आज ईडीकडून उच्च न्यायालयात देशमुख यांच्या कोठडीसाठी धाव घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांनी 12 नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे.
त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) देखील अनिल देशमुख यांची कस्टडी घेण्याच्या तयारीत आहे.
त्याबाबत सीबीआय (CBI) तयारी करत असल्याचं कळतंय.
परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी 100 कोटी रूपयांच्या वसुली आणि मनी लाँड्रिंगचे (Money laundering case) घणाघाती आरोपी अनिल देशमुख यांच्यावर केले होते.
त्याची अनेक वेळा चौकशी करण्यात आली. चौकशीनंतरच ईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली होती.
Web Title :- Anil Deshmukh | Bombay High Court remands Maharashtra’s former home minister Anil Deshmukh to Enforcement Directorate custody till 12th November
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! 30 वर्षीय पती ‘नामर्द’ असल्याचं सांगत पत्नीनेच केली समाजात ‘बदनामी’, अन्…
- Employed Wife | हायकोर्टाची कठोर टिप्पणी ! नोकरदार पत्नीचा ‘कमावणारी गाय’ म्हणून वापर करू शकत नाही
- Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार, CBI कस्टडी घेण्याच्या तयारीत