Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्या जामीनप्रकरणी मंगळवारपासून सुनावणी; सीबीआयकडून विरोधात प्रतिज्ञापत्र सादर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेले अनेक महिने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याची तयारी मुंबई उच्च न्यायालयाने दाखवली आहे. अनिल देशमुखांची (Anil Deshmukh) वैद्यकीय स्थिती आणि याचिकेतील तथ्य पाहता यावर तातडीने सुनवाई होणे आवश्यक असल्याचे मत न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केले. त्यामुळे सीबीआयला गुणवत्तेच्या आधारावर आपला युक्तिवाद सुरू करण्याचे निर्देश देत मंगळवारपासून नियमित सुनावणी घेण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक भ्रष्टाचार अशा दोन प्रकरणात जेलमध्ये असून, मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तर भ्रष्टाचारासाठी सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 4 ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही सदर आदेश कायम ठेवला होता. मात्र, सीबीआय प्रकरणात विशेष न्यायालयाने देशमुखांना जामीन देण्यास नकार दिल्याने देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील (मनी लाँड्रिंग) आरोपीला जामीन देण्यासाठी वापरलेली कारणे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वापरू शकत नाही, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी व गुन्हेगारी कट, असे गंभीर आरोप असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सीबीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पीएमएलएने नोंदवलेले बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे विधान,
भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझेने न्याय दंडाधिकार्‍यांसमोर नोंदवलेल्या जबाबाच्या समान असू शकत नाही.
पीएमएलए प्रकरणात वाझे सहआरोपी असल्यामुळे त्याच्या जबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
पण, सीबीआय प्रकरणात वाझे माफीचा साक्षीदार आहे.
तसेच पीएमएलए प्रकरण हे सीबीआय प्रकरणाचा एक भाग असल्याचा देशमुखांचा युक्तिवादही सीबीआयने फेटाळला.
पीएमएलए प्रकरण हे या प्रकरणाचा एक भाग नसून हा भ्रष्टाचार प्रतिबंधक (PC) कायद्यांतर्गत एक वेगळा आणि स्वतंत्र गुन्हा आहे.
त्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी आणि गुन्हेगारी कट असे गंभीर आरोप असल्याने पीएमएलए प्रकरणात जामीन मंजूर
करण्यात आल्यानंतर या प्रकरणात जामीन देणे योग्य ठरणार नाही, असेही सीबीआयने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | bombay mumbai high court ask cbi to start argue on merits regarding anil deshmukh bail hearing starts from tuesday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..