अनिल देशमुखांना दणका? ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हाती !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh Case Ed | ईडीचे (ED) पथक मुंबईहून नागपूरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित असलेल्या तीन जणांची रात्री उशिरापर्यंत गुप्त चौकशी केली. कोळसा व्यावसायिक धरमपाल अग्रवाल, सीए सुधीर बाहेती आणि सीए भाविक पंजवाणी या तिघांचा यात समावेश आहे. या तिघांकडून काही महत्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या (ED) पथकांनी सोबत नेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
anil deshmukh case ed conducts secret interrogation of 3 persons in nagpur collect some imp documents

एकंदरीत पाहता १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh) यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कायम आहे असं दिसत आहे. देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) नागपूरमध्ये (Nagpur) रात्री उशिरा गुप्त चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला होता. १०० कोटी वसुली प्रकरणात या आधी २५ मे देखील ईडीने सागर भटेवार, समित आयझॅक व जोहर कादरी या अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांची चौकशी केली होती. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली.

याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : anil deshmukh case ed conducts secret interrogation of 3 persons in nagpur collect some imp documents

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स

Nitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’