Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

मुंबई (Mumbai): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Anil Deshmukh |मागील काही दिवसापूर्वी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या दोन्ही सचिवांना सक्तवसुली संचालनालय (ED) कडून सचिन वाझे (Sachin Waze) आणि बार मालकांच्या जबाबवरुन अटक करण्यात आलीय. कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) या दोन्ही आरोपींच्या ED कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. या दोन्ही आरोपीना आज कोर्टात (court) हजर केले असता त्यावेळी ED नं याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 286 नवीन रुग्ण, 133 रुग्णांना डिस्चार्ज

Anil Deshmukh | case ed remanded to kundan shinde and sanjeev palande till july 6

संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) हे मध्यस्थ असल्याचं ED नं सांगितलं आहे. तर चार कोटी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते, असे देखील ED नं म्हटलं आहे. दरम्यान पुढं ED नं सांगितलं आहे की, ‘आरोपी चौकशीला सहकार्य करत नसून सचिन वाझेला ओळखत नसल्याच आरोपी म्हणत आहे. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यापुढं ठेवली आहे. तरी आरोपी सचिन वाझेला (Sachin Waze) ओळखत नसल्याचं म्हणत असल्याचं ED नं सांगितलं आहे. तसेच, सुरुवातीला ED नं कोर्टाकडे (court) दोघांचीही 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु आता आरोपींच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आलीय.

Pune Crime News | पुण्यातील कोंढवा-एनआयबीएम रोडवर अपघात; लस घेण्यास निघालेल्या 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

तर, ED नं न्यायालयात (court) सांगितलं आहे की, IPS अधिकाऱ्या बदल्या करण्यात आलेल्या
त्या लिस्ट तपासायची आहे. बदली झालेल्या IPS पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करायची
आहे. तर दोन्ही आरोपींचे आयकर डिटेल्ट (Income tax details) तपासायचे असून मिळालेल्या
कॅशचं काय झालं?, हे पैसे कुठे गेले याची चौकशी करायची आहे. असं ED च्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही अन्य मंत्र्यांची नावं आली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

म्हणून त्या यादीची तपासणी करायचं असल्याचं देखील ED नं सांगितलं आहे. तसेच, मधील काही काळात 10 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आणि त्या परत रद्द केल्या गेल्या त्या का? आणि कशाकरिता? केल्या गेल्या याचा पुरावा आमच्याकडे असल्याचा मोठा खुलासा ED चे वकील सुनिल गोंसवलीस (Lawyer Sunil Gonswalis) यांनी केलाय.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | case ed remanded to kundan shinde and sanjeev palande till july 6

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update