Anil Deshmukh case । अनिल देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती CBI ने वाढवावी, – मुंबई हाय कोर्टाचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh case । राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर असणाऱ्या आरोपाची आणि दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती केंद्रीय तपास यंत्रणाने (CBI) वाढवावी असे निर्देश मुंबई हाय कोर्टानं (High Court) दिले आहे. अनिल देशमुख यांच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे हाय कोर्टाने CBI ला दिलेत. मात्र प्रत्यक्ष म्हणजे संबंधित प्रत्येक व्यक्तीची यामधील भूमिका शोधा असं स्पष्ट होतं आहे. असं न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. आता न्यायालयाच्या या आदेशानंतर आता CBI आणखी प्रबळ होण्याची शक्यता आहे.

Modi New Cabinet । अमित शाहांकडे आणखी एका नव्या खात्याच्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

anil deshmukh case | high court says cbi should extend deshmukhs probe

पुढे हाय कोर्टानं म्हटलं आहे की, ‘आम्ही केवळ वरच्यांच्या आदेशाचे पालन करत होतो, असे म्हणून प्रशासन प्रमुख स्वतः निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही. प्रशासनप्रमुख देखील त्यास तितकाच जबाबदार आहे. सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घ्या, असे आदेश मंत्र्याने दिले असतीलही मात्र, इतक्या मोठ्या पदावर काम करत असलेली व्यक्ती आपले कर्तव्य पार न पाडता केवळ मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करते?’, असा सवाल न्यायालयाने (High Court) उपस्थित केला आहे.

Gold Rate in Pune | सोन्याचांदीच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या पुण्यातील आजचे सोन्याचांदीचे दर

‘सचिन वाझे (‘Sachin Vaze) हा धोकादायक माणूस आहे, हे माहीत असतानाही त्याला सेवेत रुजू करणाऱ्या समिती सदस्यांचीही नावे आरोपींच्या यादीत हवीत. आम्ही आता कोणाची नावे घेत नाही. कोणी या पोलिसाला पंधरा वर्षांनंतर सेवेत रुजू करून घेतले, असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. तर सीबीआयचा तपास सर्वसमावेशक आहे व त्यामधून एकही व्यक्ती सुटणार नाही. असं म्हटलं आहे. दरम्यान, CBI ने तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा आम्ही करतो. कट रचणारे कोण आहेत, हे आतापर्यंत CBI ला समजले असेल, अशी आम्हाला आशा वाटते’, असं सुनावणी दरम्यान न्या. शिंदे यांनी म्हटलं आहे. तर, या याचिकेवरील पुढील सुनावणी 12 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Online Class | ऑनलाइन क्लासमध्ये कपलचा सेक्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या दरम्यान, मागील तीन महिन्यापूर्वी CBI ने अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द
करावा म्हणून देशमुख यांनी मुंबई हाय कोर्टात आव्हान दिले होते. तर 5 एप्रिल रोजी कोर्टाने दिलेल्या
निर्देशानुसार CBI ने प्राथमिक चौकशी करून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
तसेच, मार्च महिन्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लेटर लिहून देशमुख यांनी सध्या कारागृहात असलेला
पोलीस अधिकारी सचिन वाझे याला बार व रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटी रुपये वसुली करण्याचे
आदेश दिल्याचे पत्रात म्हटलं आहे.

 
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  anil deshmukh case | high court says cbi should extend deshmukhs probe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update