Anil Deshmukh CBI Custody | सीबीआयची मोठी कारवाई ! अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh CBI Custody | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे (Anil Deshmukh CBI Custody) देण्यात आला आहे. आर्थर रोड तुरुंगातून (Arthur Road Jail) आता देशमुखांचा सीबीआयने ताबा घेतला आहे. तसेच देशमुखांची सीबीआय कोठडी मिळवण्यासाठी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

100 कोटी वसुली प्रकरणात (100 Crore Recovery Case) ईडीच्या (ED) अटकेत (Arrest) असलेल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे (Anil Deshmukh CBI Custody) देण्यात आला आहे. देशमुख यांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाने (High Court) नकार दिला. न्यायमूर्तींनी याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयकडे कस्टडी देण्याच्या निर्णयाला देशमुखांकडून आव्हान दिलं होतं. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळली. यानंतर सीबीआयाने आर्थर रोड तुरुंगातून देशमुख यांचा ताबा घेतला. केंद्रीय संस्थेने त्यांच्याविरुद्ध खंडणीचा (Ransom) गुन्हा (FIR) दाखल केला होता. याबाबत देशमुख यांचे वकील दुपारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक (Justice Prakash Naik) यांच्यापुढे पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या कस्टडीला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आवाहन दिले होते.

दोन दिवसांपूर्वी (4 एप्रिल) कारागृहात चालताना पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना उपचारासाठी शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अस्थिभंग विभागात (Fracture Section) दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांचा एमआरआय (MRI) करण्यात आला होता. अनिल देशमुख, सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला होता. परंतु देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही वेळ वाट पहावी लागली. ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात (Corruption Case) पुढील चौकशी करण्यासाठी सीबीआयला देशमुख, वाझे, पलाडे आणि शिंदे यांचा ताबा पाहिजे आहे.

Web Title : Anil Deshmukh CBI Custody | CBI takes former Home Minister of Maharashtra,
Anil Deshmukh in their custody from Arthur Road Jail where he is currently lodged

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज,
व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!