Anil Deshmukh | अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट?, CBI नं दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Anil Deshmukh | महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा गंभीर आरोप केला होता. यावरून सीबीआय चौकशी आणि तपास सुरू होता. आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट (clean chit) देण्यात आली असल्याचे वृत्त आहे. स्वता सीबीआयने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसूली प्रकरणात सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याचे वृत्त समोर आले. याबाबतीची पीडीएफ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पीडीएफमध्ये सीबीआयच्या 65 पानी प्राथमिक तपासाच्या अहवालाची (65-page preliminary investigation report) प्रत आहे.

उपअधीक्षक आर.एस. गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशमुख यांच्याविरुद्ध एकही पुरावा न मिळाल्याने चौकशी बंद करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची चर्चा आहे. सकाळपासून याबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानंतर सीबीआयने प्रतिक्रिया दिली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

सीबीआयने म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि इतर अज्ञात लोकांच्या विरोधात नोंदवलेल्या प्रकरणाबाबत मीडियात अनेक प्रश्न प्राप्त झाले आहेत.
हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित
याचिकांच्या आधारे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.

प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाने चौकशीदरम्यान गोळा केलेले
पुरावे आणि कायदेशीर मत यावर आधारित नियमित केसची नोंदणी करण्याचे निर्देश दिले.
सीबीआयने 21.04.2021 रोजी नोंदवलेला एफआयआर 24.04.2021 पासून सीबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title : Anil Deshmukh | cbi first reaction on maharashtra former home minister anil deshmukh clean chit