Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ! CBI ने दाखल केले आरोपपत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) शंभर कोटी वसुली प्रकरणी माफीचा साक्षीदार होताच सीबीआयने (CBI) या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात (Special CBI Court) आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केलं आहे.

 

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपत्रात एकूण 59 पानांचे आरोपपत्र असून या आरोपपत्रात मुख्य आरोपी म्हणुन अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आले आहे. तसेच, त्यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून सीबीआय न्यायालयात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणी सुनावणी पुर्ण होताच सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे.

 

या दरम्यान, सचिन वाझे याने मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावा असा अर्ज केला होता. त्यावर 25 मे रोजी सीबीआयने आपले म्हणणे मांडत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यास होकार दिला होता. आता 1 जुनला विशेष सीबीआय न्यायालयाने या अर्जावर आदेश देत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्यास मंजूरी दिली आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | chargesheet filed by cbi against anil deshmukh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा