Anil Deshmukh । ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘वसुली’ मंत्री काही दिवसातच तरूंगात जाणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयानं (ED) छापा टाकला. आज (शुक्रवारी) सकाळीच कारवाईसाठी ईडी पथक दाखल झाले. तसेच, देशमुख यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले. ईडीकडून दोनवेळा देशमुख यांच्या घरावर छापा टाकला गेला. यावरून भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावर एक वक्तव्य केलं आहे. ‘काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

 

किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की, ‘अनिल देशमुखच्या  घरी आज ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्यामधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे तीन वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची देखील अशीच अवस्था होणार असल्याचं सोमय्यांनी  म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, तसेच, ‘ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या  घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्टर अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच होईल. असे देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.

ईडीकडून अनिल देशमुखांच्या घरी छापा –

गुरूवारी रात्रीच सक्तवसुली संचालनायलयाचे  पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी (25 जून) सकाळी स्थानिक EDअधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी आणि निकटवर्तीयांकडे धाड टाकली. दरम्यान, 16 जूनला
ईडीच्या 3 पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित 2 सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे
टाकले होते.

हे देखील वाचा

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Anil Deshmukh | कालच भाजपनं अजित पवारांविरोधात सीबीआय चौकशीचा ठराव केला मंजूर, आज अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | ed raided on anil deshmukh residence i am sure in few days he will be in jail bjp leader kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update