Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | सक्त वसुली संचालयनालयाने (ED) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’) तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी छापे (raid) घातले. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुंबईतून ईडीचे पथक गुरुवारी रात्री नागपूरात (Nagpur)  पोहोचले आणि शुक्रवारी सकाळीच स्थानिक अधिकार्‍यांच्या मदतीने या पथकाने अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थान तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी सकाळी ७ वाजता छापे टाकले. यावेळी त्यांनी पोलिसांचा प्रचंड ताफाही सोबत घेतला आहे. ईडी (Ed) चे ५ अधिकारी अजूनही देशमुख यांच्या घरी तपासणी करीत आहेत.

१६ जून रोजी दोन सीए तसेच एका कोळसा व्यापार्‍याच्या घरी ईडीने छापे टाकले होते. या छाप्यानंतर देशमुख यांचीही ईडीकडून झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, ईडीने नागपूरच्या घरावर छापा टाकला असला तरी स्वत: देशमुख हे नागपूरच्या घरी नाहीत.

पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांचाही नोंदविला जाब

मनी लाँडरिंग प्रकरणाची ( money laundering case ) चौकशी करणार्‍या ईडीने गुरुवारी पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांचे निवेदन नोंदविले आहे.
भुजबळ हे सध्या मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी शाखेचे प्रभारी आहेत.
त्यांच्या कार्यक्षेत्रात सामाजिक सेवा शाखा आहे. सामाजिक सेवा शाखा पब, हुक्का पार्लर, डान्स बार, बार आणि रेस्टॉरंट्सवर तपासणी व छापे टाकते.
याच रेस्टॉरंट, पब, डान्स बारकडून दरमहा पैसे गोळा करुन १०० कोटी रुपये देण्याचे अनिल देशमुख यांनी सचिन वाजे (Sachin Waje) याला सांगितले होते,
असा आरोपी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Commissioner of Police Parambir Singh) यांनी केला होता.
याप्रकरणातच मनी लाँडरिंगचा प्रकार झाल्याच्या संशयावरुन ईडीने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.

१०० कोटी रुपयांच्या प्रकरणावरुन सीबीआयनेही यापूर्वी अनिल देशमुख व त्यांच्याशी संबंधित नातेवाईकांच्या घर,
कार्यालये अशा १० ठिकाणी छापे घालून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

Web Titel : Anil Deshmukh | ed raids on former home minister anil deshmukhs house nagpur, deshmukh is in trouble?

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST