Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ED ची लुक आऊट नोटीस; ED ला वाटते देशमुख जातील परदेशात ‘पळून’

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने लुक आऊट नोटिस जारी केली आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) हे परदेशात पळून जातील, अशी भिती ईडीला वाटत असल्याने त्यांनी ही नोटीस जारी केली आहे.

१०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावून चौकशीला बोलावले होते. परंतु, ते अद्याप ईडीकडे चौकशीसाठी आले नाहीत. अनिल देशमुख यांनी ईडीने  दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हा तपास मुंबईबाहेरील ईडीच्या अधिकार्‍यांकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे. तसेच आपला जबाब डिजिटल पद्धतीने रेकॉर्ड करावा, अशीही मागणी केली आहे.  अनिल देशमुख यांचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय जोपर्यंत त्यावर आपला निर्णय देत नाही, तोपर्यंत ईडी त्यांनी जबाब देण्यासाठी यावे, यासाठी आग्रह करु शकत नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

दरम्यान, ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांचा शोध घेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिल
देशमुख ह कोणालाही भेटलेले नाही. त्यांचा पत्ताही कोणाला माहिती नाही. त्यामुळे ईडीने ही लुक आऊट नोटिस काढल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Maharashtra in corona | महाराष्ट्रात लागू कोरोना प्रतिबंधांमध्ये आणणार शिथिलता, CM उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या या अटी

Raju Shetty | ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anil Deshmukh | eds preparations for arrest after lookout notice to anil deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update